निमित्त होते विद्यार्थी आणि शिक्षकाचे नाते जपणाऱ्या अनोखा सन्मान सोहळ्याचे. आरमोरी येथील केमिस्ट भवनात शिक्षक दिनी ५ सप्टेंबर राेजी रविवारला हा सोहळा पार पडला. सन १९९३ च्या महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन कार्यक्रम आयाेजित करण्यात आला होता.
या स्नेहमिलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. हरिराम वरखडे होते. प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी उच्च विद्यालयाचे प्राचार्य साईनाथ अद्दलवार, सामाजिक कार्यकर्त्या शालिनी गेडाम, कलिराम गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमात माजी शिक्षक ताराचंद नागदेवे, मधुकर भोयर, यशवंत सोरते, नत्थुजी आकरे, अरुण कोयाडवार, ज्ञानेश्वर लोखंडे, शरद जोंजाळकर, विजया मानकर, मालती मारोडकर, चंद्रकला सेलोकर या शिक्षकांचा शाल, श्रीफळ व सन्माचिन्ह देऊन माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. २८ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांनी सेवानिवृत्तीनंतर आपला सत्कार करून आदर व्यक्त करणे हा जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे, अशा भावना यावेळी माजी शिक्षकांनी व्यक्त केल्या.
प्रास्ताविक डॉ. प्रदीप खोब्रागडे यांनी, संचालन प्रा. अमरदीप मेश्राम यांनी तर आभार डॉ. मुखरू चिखराम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नागसेन घोडसे, अरविंद डुभरे, श्रीकांत गलमलकर, किशोर सेलोकर, सचिन वनमाळी, रवी गणवीर, रवी डोकरे, डॉ. अमोल धात्रक, ॲड. विजय निंबेकार, चंद्रशेखर गिरीपुंजे, मंगेश सदाफले, रणजित बेहरे, अजय बोडे, मुबारक खान पठाण, महेंद्र दहिकर, भूषण चिखराम, निसार खान पठाण, योगेश दुमाने, प्रवीण दामले, प्रफुल ठवकर, प्रवीण रामपूरकर, यशकुमार सपाटे, श्रीनिवास मादेशी आदींनी सहकार्य केले.
(बॉक्स)
वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत विद्यार्थी एकत्र
दहावीपर्यंत एकाच वर्गात खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण घेणारे विद्यार्थी पास झाल्यानंतर वेगवेगळ्या शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यावेळी विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षक आता सेवानिवृत्त झाले आहेत. आपली नोकरी, व्यवसाय व वैवाहिक जीवनात रमलेले त्या १९९३ च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी तब्बल २८ वर्षांनंतर शिक्षक दिनी एकत्र आले होते. बऱ्याच वर्षाच्या भेटीगाठीने आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या आदर व सत्काराने शिक्षक भारावून गेले.
060921\1044img-20210906-wa0044.jpg
आरमोरी येथे शिक्षक दिनी माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेहमीलन कार्यक्रमात उपस्थित शिक्षक व माजी विद्यार्थी