आमदार व जि. प. अध्यक्षांचा पुढाकार : प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची सभाचामोर्शी : जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांचे वेतन, स्वच्छतागृह बांधकामाचे अनुदान, आंतरजिल्हा बदली यासह शिक्षकांच्या विविध मागण्यांच्या मुद्यांबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्या दालनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांची सभा गुरूवारी पार पडली. या सभेत जि. प. अध्यक्ष योगिता भांडेकर व आ. डॉ. देवराव होळी यांनी पुढाकार घेऊन सकारात्मक आश्वासन दिले. त्यामुळे आता शिक्षकांच्या समस्या मार्गी लागणार आहेत. यावेळी सभेला जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) मनमोहन चलाख, माजी पं स. सभापती केशव भांडेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात लोकप्रतिनिधी, अधिकारी व शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. याप्रसंगी शिक्षकांचे वेतन दर महिन्याला नियमित व बिनाविलंब करण्यात येईल, असे आश्वासन जि. प. च्या लेखाधिकाऱ्यांनी दिले. चटोपाध्याय व निवडश्रेणीबाबत लवकरच प्रस्ताव मंजुरीकरिता अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल. शालेय वीज बिलासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आ. डॉ. देवराव होळी व जि. प. अध्यक्ष योगिता भांडेकर यांनी दिली. यावेळी शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष प्रमोद कावडकर, रघुनाथ भांडेकर, किशोर कोहळे, देवेंद्र लांजेवार, लोमेश उदिंरवाडे,राजेश चिलमवार, आशिष धात्रक,धनेश कुकडे, जनार्धन म्हशाखेञी, बापू मुनघाटे, अशोक रायशिडांम, शिला सोमनकर, कल्पना आकनूरवर, स्मृती कुडकावार, शिल्पा काळे, सुरेश वासलवार, अंकुश मैलारे, समीर भाजे, कविता आंबोरकार, मेघा कोठारे, मारोती वनकर, सुजीत दास, पुरुषोत्तम गायकवाड, गोपाल डे, दिलीप कुनघाडकर, पुरुषोत्तम किरमे, प्रशांत पोयाम, अशीम बिश्वास, राजू पोरेडीवार, संजय मडावी, गजानन शेंद्रे, नीलकंठ निकुरे, सदानंद लांजेवार, सुरेश चौव्हान, चलाख, भुजंगराव नारनवरे, सिद्बार्थ सोरते, रामचंद्र मुंगमोडे, सुरेश पालवे, प्रभाकर कोठारे, जी. बी. बावनथडे, बाळकृष्ण ढोरे, लिलाधर वासेकर, नितीन कुंभारे, मारोती आरेवार, गुणवंत कुनघाडकर, नरेंद्र कुनघाडकर, जितेंद्र रायपुरे, टी. टी. सरकार, जुमनाके, नरेश जांपलवार, तानाजी भांडेकर, रुषीदेव कुनघाडकर, अविनाश भोवरे, किशोर कस्तुरे, सुनील सातपुते, अशोक जुवारे, राजेंद्र आदे, तुळशीराम शेडमाके, साईनाथ सोनटके, राजेश मुर्वतकर, जीवन सिडाम, महादेव डे, नारायण मलिक, जी. एच. देवनाथ व शिक्षक संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
शिक्षकांच्या समस्या मार्गी लागणार
By admin | Published: April 21, 2017 1:14 AM