स्पर्धेचे उद्घाटन राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक वाघमारे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ठाणेदार सुधाकर देडे, सहायक पोलीस निरीक्षक समीर केदार, पोलीस उपनिरीक्षक शीतल माने, कुलदीप सोनटक्के उपस्थित होते. कबड्डी स्पर्धत विजेत्या ठरलेल्या तळेगावच्या प्रेड अकॅडमी कबड्डी संघाला ३ हजार, उपविजेत्या येरंडीच्या प्रेम दिवाने कबड्डी संघाला २ हजार तर तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या तळेगावच्या के.के. कबड्डी संघाला १ हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले. व्हाॅलिबाॅल स्पर्धेत विजेत्या ठरलेला कढाेलीच्या हिंदवी स्वराज्य संघाला ३ हजार रुपये, उपविजेत्या राणाप्रताप वाॅर्ड संघाला २ हजार तर तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या डाेंगरगावच्या जयसेवा संघाला १ हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील व्हाॅलिबाॅलचे २४ तर कबड्डीचे २१ संघ सहभागी झाले होते. दोन्ही क्रीडा प्रकारात अजिंक्य ठरलेले संघ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयस्तरावर आयोजित स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कुरखेडा पोलीस स्टेशनमधील कर्मचारी, राज्य राखीव पोलीस बल तसेच येथील उपजिल्हा रुग्णालयाती कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
तळेगाव व कढाेलीचा संघ ठरला विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:48 AM