दिलीप दहेलकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गेल्या काही दिवसांपासून येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वेदनेने त्रस्त असलेल्या रुग्णांवर दुर्बिणीद्वारे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून रुग्णांना दिलासा देण्याचे काम येथील तज्ज्ञ करीत आहेत. असाच प्रकार जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवारी घडला. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कान, नाक, घसातज्ज्ञ डाॅ. अजय कांबळे यांनी एका ३५ वर्षीय महिला रुग्णाच्या डाेळ्यातील अश्रूंच्या ग्रंथीची नाकाद्वारे दुर्बिणीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. या रुग्ण महिलेच्या डोळ्याच्या बाहेरील आवरणाला सूज येऊन डोळा लाल होऊन सतत गळत होता. ही अश्रू पिशवींची एक दाहक स्थिती असते, जी सामान्यत: नासाेलॅक्रिमल डक्टच्या आंशिक किंवा पूर्ण अडथळ्यांशी संबंधित असते. यामध्ये पाणी येऊन स्त्राव हाेणे असा प्रकार हाेत असताे. असाच काहीसा आजार गडचिराेली येथील या महिलेच्या डाेळ्याला जडला. त्या महिलेच्या एका डाेळ्याला सूज येऊन डाेळे लाल झाले हाेते. शिवाय डाेळ्याच्या काेपऱ्यात सतत दुखत हाेते. या महिलेने शासकीय रुग्णालयात औषधाेपचार केला. मात्र पूर्णत: आराम झाला नाही. दरम्यान, ईएनटी स्पेशालिस्ट डाॅ. कांबळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात ओपीडीमध्ये या महिला रुग्णाची तपासणी केली. दरम्यान, अश्रूंच्या ग्रंथींचे इन्फेक्शन झाल्याचे आढळून आले. अश्रूंचा रस्ता पूर्णत: बंद झाला हाेता. यावर शस्त्रक्रिया हाच कायमस्वरूपी उपाय असल्याचे डाॅक्टर कांबळे यांनी या रुग्णाला सांगितले. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अनिल रूडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी जिल्हा रुग्णालयात डाॅ. कांबळे यांनी दुर्बिणीच्या साहाय्याने दुर्बिणीद्वारे बिनाटाक्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. विशेष म्हणजे, गडचिराेली जिल्ह्यात नाकाद्वारे चिरा न मारता पार पडलेली ही अश्रूंच्या ग्रंथीची पहिलीच शस्त्रक्रिया आहे.
इन्फेक्शनची लक्षणे...- डाेळ्यांच्या आतील काेपऱ्यात लालसरपणा येताे. त्यावर सूज व दुखणे असते. डाेळा लाल हाेताे. सतत गळत राहताे. काही रुग्णांचे यामुळे डाेकेही दुखते. या आजारात रुग्णाला तापही असताे. डाेळ्यातून अश्रू व पस सतत निघत असताे. यावर गाेळ्या व औषधी काम करीत नाही. शस्त्रक्रिया हाच यावर शेवटचा उपाय आहे.
दाेन पध्दतीने हाेतात शस्त्रक्रियाडाेळ्यांच्या ग्रंथीच्या शस्त्रक्रिया नेत्रतज्ज्ञ व ईएनटी स्पेशालिस्ट असेही दाेन्ही तज्ज्ञ करतात. नेत्रतज्ज्ञ अशा आजारामध्ये बाहेरून चिरा मारून शस्त्रक्रिया करतात, तर ईएनटी स्पेशालिस्ट नाकाद्वारे दुर्बिणीच्या साहाय्याने बिनाटाक्याची शस्त्रक्रिया करतात.
महिला रूग्णांवर दुर्बिनीद्वारे अश्रूंच्या ग्रंथीची शस्त्रक्रिया करून ही ग्रंथी खुली केली. त्यातील पस पूर्णत: काढून स्वच्छता केली. अश्रूंचा रस्ता माेकळा केला. आता डाेळे गळणे पूर्णत: बंद झाले आहे. सुक्ष्म जीवांचे इन्फेक्शन व अस्वच्छ हाताने डाेळे वारंवार चाेळल्याने असा आजार हाेताे.- डाॅ. अजय कांबळे, कान, नाक, घसा तज्ज्ञ, जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिराेली