लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : तेली समाजाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रगतीसाठी तेली समाज बांधवांनी पोटजातीची बंधने तोडून देणे गरजेचे आहे. हुंड्यासारखी कुप्रथा कालबाह्य करावी. त्याशिवाय समाजाचा विकास शक्य नाही, असा सूर उपस्थित मान्यवरांनी काढला.वैरागड येथे संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी व तेली समाज मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाग्यवान खोब्रागडे होते. उद्घाटन बबनराव फंड यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, प्रभाकर वासेकर, प्रा. डॉ. रवींद्र विखार, बाबुराव कोहळे, रमेश भुरसे, माजी प्राचार्य पी. आर. आकरे, पं.स. सदस्य विनोद बावणकर, फाल्गुन मेहरे, उपसरपंच श्रीराम अहिरकर, केशव गेडाम, पुनम गुरनुले, शंकरराव बावणकर, गोरखनाथ भानारकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वधु-वर परिचय मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर बोडणे, संचालन नेताजी बोडणे तर आभार प्रदीप बोडणे यांनी मानले. कार्यक्रमाला विजय गुरनुले, डोनुजी कांबळे, मुनेश्वर मडावी, अतुल मेश्राम, नलिनी सहारे, महादेव दुमाने, मुख्याध्यापक बोबाटे, सुभाष बरडे, श्रावण नागोसे, पी. एस. खोब्रागडे, मुरलीधर शेंदरे, लिलाधर उपरे आदीसह तेली समाज बांधव उपस्थित होते.यशस्वीतेसाठी घनश्याम लांजेवार, पांडुरंग बावणकर, रमेश लांजेवार, सचिन ढेंगे, राजेश बावणकर, गंगाधर बोधनकर, रमेश बोडणे, कैलास मेहरे, गायत्री आकरे, मंदा बोधनकर, उषा बोडणे, दीक्षा लांजेवार, इंदू खोब्रागडे, इंदूबाई खोब्रागडे, कल्पना बोडणे, कल्पना आकरे, लिला क्षिरसागर, वंदना खोब्रागडे, पितांबर लांजेवार, मुखरू खोब्रागडे, सुरेंद्र बावणकर, आकाश सोमनकर, अशोक लांजेवार, प्रकाश आकरे व समाज बांधवांनी सहकार्य केले.
तेली समाजाने पोटजातीची बंधने तोडावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 1:29 AM
तेली समाजाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रगतीसाठी तेली समाज बांधवांनी पोटजातीची बंधने तोडून देणे गरजेचे आहे. हुंड्यासारखी कुप्रथा कालबाह्य करावी. त्याशिवाय समाजाचा विकास शक्य नाही, असा सूर उपस्थित मान्यवरांनी काढला.
ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : वैरागडात तेली समाज मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव