लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांना आवश्यक असलेले सर्व प्रमाणपत्र व दाखले उपलब्ध व्हावे, यासाठी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडिल यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना दाखले उपलब्ध होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.भामरागड तालुक्यातील बिनागुंडा, कुआकोडी, फोदेवाडा, दामनमर्का, तुरमर्का, पिरमिलभट्टी, पुंगासूर या गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते नाहीत. तालुका स्थळापासून या गावांचे अंतर ५० ते ६० किमी आहे. वाहने नसल्याने या भागातील नागरिक प्रमाणपत्र काढत नाही. परिणामी त्यांना दाखल्यांपासून वंचित राहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन या भागातील नागरिकांच्या दाखल्यांचे प्रस्ताव आॅनलाईन पाठविण्याचे निर्देश सेतू केंद्रचालकांना दिले आहेत. त्याचबरोबरच प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेले दाखले संबंधित कर्मचाऱ्यांनी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश दिले. तहसीलदारांच्या निर्देशानंतर यंत्रणा कामाला लागून प्रमाणपत्र उपलब्ध होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. प्रस्ताव सादर केल्यानंतर संबंधित व्यक्तीला तीन महिन्यांच्या आत प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाईल, असा विश्वास तहसीलदार अंडिल यांनी व्यक्त केला. बिनागुंडा परिसरातील गावांना भेटी देऊन या परिसरातील समस्या जाणून घेतल्या. काही गावांना रस्ते नाहीत, पाण्याची सुविधा नाही, या समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले.
दाखल्यांसाठी तहसीलदारांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:42 AM
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांना आवश्यक असलेले सर्व प्रमाणपत्र व दाखले उपलब्ध व्हावे, यासाठी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडिल यांनी पुढाकार घेतला आहे.
ठळक मुद्देबिनागुंडा परिसरात सभा : प्रमाणत्रांअभावी अनेक नागरिक योजनांपासून वंचित