आंतरराज्य पूल बनल्यानंतर लगेच एका महिन्यातच तेलंगणा सरकारने पुढाकार घेत असिफाबाद डेपोतील बस गुडेममार्गे अहेरी व आलापल्लीपर्यंत सोडण्याची सुरुवात केली. ज्यामुळे रोटी-बेटीचे संबंध असलेले कित्येक प्रवासी त्या बसने प्रवास करत असत. अहेरी उपविभागातील तेलंगणाकडे जाणारे प्रवासी अहेरी व आलापल्लीमधून निवांतपणे प्रवास करत होते; परंतु दहा दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने पूर्वीपासूनच खराब असलेल्या रस्त्याची आणखी दुर्दशा केल्याने त्या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहे. ज्यामध्ये एक ट्रकही उलटला होता आणि तेव्हापासून तेलंगणामधून येणाऱ्या बसेसच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. रद्द झालेल्या बसफेऱ्यांचा प्रभाव प्रवाशांवर मोठ्या प्रमाणात पडला आहे. आता प्रवाशांना स्वतःच्या मालकीची चारचाकी किंवा ऑटोच्या साहाय्याने गुडम गाठावे लागत आहे; पण त्यातही दुर्घटनाग्रस्त ठरू शकणाऱ्या त्या रस्त्यावर प्रवास मात्र करावाच लागत आहे. आंतरराज्य पुलापासून राज्यमार्गपर्यंत येणारा पोच व जमीन अधिग्रहणासाठी माजी राज्यमंत्री व आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी ७० कोटी रुपयांची रक्कम मंजूरसुद्धा केली आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल; पण अद्यापही तात्पुरता मार्ग रहदारी योग्य नसल्याने व त्या मार्गाकडे शासन व प्रशासनाच्या लक्ष देणे गरजेचे आहे. शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे ही समस्या प्रवाशांवर ओढवली आहे.
बाॅक्स
बसफेऱ्या अजुनही पूर्ववत नाहीत
तेलंगणातील असिफाबाद डेपोमधून अहेरी व आलापल्लीसाठी सकाळी ६.३० वाजता, १०.३० दुपारी १२.०० वाजता, ३.०० वाजता त्यानंतर सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत, अशा पाच फेऱ्या चालत असल्याने प्रवाशांना आप्तस्वकीयांना भेटण्यासाठी सहज सुविधा मिळत होती. ती पूर्णपणे बंद झाली आहे; परंतु आता तरी महाराष्ट्र प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बस पूर्ववत सुरू होतील, अशी व्यवस्था करून देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
बॉक्स
तळीरामांची अवस्था भीतीदायक
अहेरीतून २ किमी अंतरावर असलेल्या गुडेम येथे आपली हौस पूर्ण करण्यासाठी नियमित जाणाऱ्या तळीरामांनासुद्धा या खड्डे पडलेल्या मार्गाचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे त्यांच्या मनात भीतीदायक अवस्था निर्माण झाली आहे. जाताना प्रत्येक जण स्वतःला आवरतच जातो; पण येताना तोल संभाळणे कठीण होत आहे.
110921\img_20210911_162838.jpg
पोचमार्गावर पडलेले खड्डे