लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : काँग्रेस सरकारच्या काळात विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत सहज पोहोचत होता. मात्र विद्यमान भाजपप्रणित सरकारने जुन्याच योजनांचे नाव बदलवून अनेक योजनांचे नविनीकरण केले. यात जाचक अटी व निकष समाविष्ट केले. त्यामुळे मागासवर्गीय लोकांना मिळणाºया सवलती बंद झाल्या. भाजपच्या सत्ताधारी पुढाºयांनी निवडणुकीपूर्वी अनेक मोठमोठी आश्वासने जनतेला दिली. मात्र तीन वर्षात गडचिरोली जिल्ह्यात विकासाचा पत्ता नाही. केवळ दिखावूपणा सुरू आहे. भाजपचा हा दुटप्पी व फोलपणा आता गावागावात सांगण्याची गरज आहे. हे काम काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.गडचिरोली तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक रविवारी येथील सभागृहात पार पडली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी मंचावर प्रामुख्याने माजी खासदार मारोतराव कोवासे, जि.प. सदस्य अॅड. राम मेश्राम, नगरसेवक तथा शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा महासचिव समशेर खॉ. पठाण, पंकज गुड्डेवार, पांडुरंग घोटेकर, युकाँचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रभाकर वासेकर, सी. बी. आवळे, नेताजी गावतुरे, पी. टी. मसराम, समया पसुला, रजनीकांत मोटघरे, नंदू वाईलकर, आशिष कन्नमवार, लहुकुमार टिपले, पं.स. सभापती दुर्लभा बांबोळे, पं.स. सदस्य मालता मडावी, शंकरराव सालोटकर, आशा मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. उसेंडी म्हणाले, काँग्रेसने एससी, एसटी, एनटी, ओबीसीसह बहुजन व मागासवर्गीयांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता विद्यमान सरकारने मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्ती योजनेच्या लाभाला रोख लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. गेल्या तीन वर्षांपासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. त्यामुळे हे विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जाती-जाती व समाजात भेदभावाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. भाजप सरकारची नोटबंदी पूर्णत: फसली असून याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास झाला. शाळांमध्ये राबविण्यात येणाºया मोफत गणवेश योजनेत जाचक अटी घातल्याने या योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. योजना द्यायच्या मात्र त्यात जाचक निकष टाकून प्रक्रिया गुंतागुंतीची करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे काम विद्यमान सरकार करीत आहे. त्यामुळे या सरकारवरील जनतेचा विश्वास आता उडाला आहे, असेही डॉ. उसेंडी यावेळी म्हणाले. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांच्या हिताची काँग्रेस पुढे येणे आवश्यक आहे. त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांचा व सरकारचा दुटप्पीपणा जनतेपुढे मांडावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी माजी खा.मारोतराव कोवासे यांनीही मार्गदर्शन केले. जि.प. सदस्य अॅड. रामभाऊ मेश्राम, नगरसेवक सतीश विधाते यांनी काँग्रेस पक्ष संघटनेबाबत महत्त्वाच्या सूचना करून भाजप सरकारच्या धोरणावर जोरदार टिका केली. प्रास्ताविक शंकरराव सालोटकर, संचालन एजाज शेख यांनी केले.पारित झालेले ठरावयावेळी जिल्हा काँग्रेस पार्टीतर्फे विविध महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. यामध्ये गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करून शेतकºयांना प्रती एकरी ५० हजार रूपयांची मदत द्यावी, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, खनिज संपत्तीवर प्रक्रिया उद्योग निर्माण करावेत, विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती त्वरीत द्यावी तसेच रखडलेले सिंचन प्रकल्पांना निधी देऊन हे प्रकल्प मार्गी लावावे, आदींचा समावेश आहे.
भाजप सरकारचा दुटप्पी व फोलपणा गावागावात सांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:33 AM
काँग्रेस सरकारच्या काळात विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत सहज पोहोचत होता. मात्र विद्यमान भाजपप्रणित सरकारने जुन्याच योजनांचे नाव बदलवून अनेक योजनांचे नविनीकरण केले.
ठळक मुद्दे नामदेव उसेंडी यांचे आवाहन : काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक