लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात गेल्या १२ वर्षांपासून अस्थायी स्वरूपात शेकडो वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवा देत आहेत. मात्र याबाबतचा शासन निर्णय होऊनही गडचिरोली जिल्ह्यातील अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना अद्यापही स्थायी करण्यात आल्या नाही. परिणामी हे अस्थायी डॉक्टर एकस्तर वेतनश्रेणीपासून वंचित आहेत.गडचिरोली जिल्ह्याची आरोग्य सेवा बळकट व्हावी, या उद्देशाने दुर्गम, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व रूग्णालयांमध्ये अस्थायी स्वरूपाची अनेक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. ९ मार्च २०१८ रोजी ग्राम विकास विभागाने एकस्तर वेतनश्रेणी लागू करण्याबाबत पत्र निर्गमित केले आहेत. मात्र या अस्थायी वैद्यकीय अधिकाºयांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करण्यात आली नाही.२८ आॅगस्ट २०१७ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यभरातील ७३८ अस्थायी वैद्यकीय अधिकाºयांना स्थायी करण्याबाबत कॅबिनेट बैठकीत निर्णय झाला होता. मात्र अद्यापही या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत अस्थायी करण्यात आले नाही.१२ जून २०१७ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोली यांच्याकडून शासनाला याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला. आरोग्य संचालक कार्यालय मुंबई येथे अस्थायी डॉक्टरांच्या स्थायीत्वाचा व एकस्तर वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव धूळखात पडला आहे. एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाºयांना लागू करण्यात आला असून तेथील वैद्यकीय अधिकारी या वेतनश्रेणीचा लाभ घेत आहेत. मात्र गडचिरोली या नक्षलग्रस्त व मागास जिल्ह्यातील अस्थायी वैद्यकीय अधिकाºयांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करण्यात न आल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे.गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी व सुधारण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सत्ताधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र येथील वैद्यकीय अधिकारी आपल्या हक्कापासून वंचित असल्याने जिल्ह्याची आरोग्य सेवा बळकट कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वैद्यकीय अधिकाºयांना स्थायी करून एकस्तर वेतनश्रेणी लागू न केल्यास अस्थायी वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येणार असल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होणार आहे.अस्थायी डॉक्टरांच्या भरवशावरच आरोग्य सेवागडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागात कार्यान्वित करण्यात आले आहे. याशिवाय गडचिरोली येथे जिल्हा सामान्य, महिला व बाल रूग्णालय तसेच तालुकास्तरावर उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालय आहेत. या सर्व रूग्णालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सेवा दिली जाते. मात्र अनेक रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने त्या ठिकाणी अस्थायी स्वरूपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थायी वैद्यकीय अधिकारी फारसे मुख्यालयी राहत नाही. शिवाय त्यांना आढावा बैठकीसाठी गडचिरोलीला यावे लागते. अशा वेळी अस्थायी वैद्यकीय अधिकारीच संबंधित रूग्णालयातील आरोग्य सेवा सांभाळतात. एकूणच गडचिरोली जिल्ह्याची आरोग्य सेवा अस्थायी डॉक्टरांच्या भरवशावर अवलंबून आहे.
अस्थायी डॉक्टर वेतनश्रेणीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 10:56 PM
गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात गेल्या १२ वर्षांपासून अस्थायी स्वरूपात शेकडो वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवा देत आहेत. मात्र याबाबतचा शासन निर्णय होऊनही गडचिरोली जिल्ह्यातील अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना अद्यापही स्थायी करण्यात आल्या नाही. परिणामी हे अस्थायी डॉक्टर एकस्तर वेतनश्रेणीपासून वंचित आहेत.
ठळक मुद्दे१२ वर्ष उलटले : शासनाकडून कार्यवाही थंडबस्त्यात, संघटना आक्रमक पवित्र्यात