जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेला तेंदूपत्ता संकलनाच्या माध्यमातून जवळपास महिनाभराचा राेजगार उपलब्ध हाेते. महिनाभरात बरीच कमाई हाेत असल्याने तेंदूपत्ता संकलनाची नागरिक प्रतीक्षा करीत राहतात. मागील वर्षी काेराेनामुळे कडक लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. याचा माेठा परिणाम तेंदूपत्ता संकलनावर झाला हाेता. जिल्हाबंदीमुळे गावापर्यंत कंत्राटदारच पाेहाेचू शकले नाही. त्यामुळे अनेक गावांमध्ये तेंदूपत्याचे लिलावच झाले नाही. परिणामी तेंदूपत्त्यापासून मिळणाऱ्या राॅयल्टीसह गावातील नागरिकांचा राेजगार हिरावला गेला. आधीच काेराेनाचे संकट त्यात राेजगारही गेल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले हाेते. यावर्षी मात्र तेंदूपत्त्याला चांगला भाव मिळाला आहे. तसेच तेंदूपत्ता संकलनाचे काम काेणत्याही अडथळ्याविना सुरू आहे. मागील १५ दिवसांपासून तेंदूपत्त्याचे संकलन सुरू आहे. पुन्हा आठ दिवस तेंदूपत्ता संकलनाचे काम चालणार आहे. काही फळ्यांवरचा तेंदूपत्ता कंत्राटदारांनी उचलण्यास सुरूवात केली आहे. तेंदूपत्त्याची उचल करण्यातूनही काही प्रमाणात राेजगार उपलब्ध हाेतो.
बाॅक्स
उत्तरेकडील तालुक्यांना वाघांमुळे फटका
गडचिराेली, धानाेरा, आरमाेरी, देसाईगंज या तालुक्यांमध्ये वाघ व बिबट्यांची संख्या वाढली आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या नागरिकांवर वाघांचे हल्ले झाले आहेत. आतापर्यंत गडचिराेली तालुक्यातील तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही गावच्या फळ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा राेजगार हिरावला गेला आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात दूरपर्यंत जावे लागते, अशावेळी वाघांकडून हल्ला हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाघांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.
बाॅक्स
पावसाचा फटका
अधूनमधून अवकाळी पाऊस पडत आहे. वादळामुळे तेंदूपत्त्याचे पुडे उडून जात असल्याने कंत्राटदारांचे नुकसान हाेत आहे. तसेच पावसामुळे तेंदूपत्ता ओला हाेत असल्याने ताे पुन्हा वाळण्यास काही कालावधी लागतो. पूर्वी बाहेरगावचे मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी जात हाेते. ते गावाच्या जवळच जंगलात झाेपड्या उभारून राहात हाेते. आता मात्र बाहेरगावचे मजूर राहत नाही. गावातीलच मजूर तेंदूपत्त्ता संकलन करीत असल्याने ते सुरक्षित राहतात.