लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जम्मू-काश्मीर राज्यातील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे ४४ जवान शहीद झाले. या घटनेचा सर्वपक्षीय नेत्यांतर्फे शुक्रवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात निषेध करण्यात आला. तसेच शहीद जवानांना मानवंदना अर्पण करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, माजी आ.डॉ. नामदेव उसेंडी, न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मनवाडे, न.प.सभापती आनंद श्रुंगारपवार, मुक्तेश्वर काटवे, नगरसेवक प्रमोद पिपरे, सतीश विधाते, केशव निंबोड, रमेश भुरसे, रंजना गेडाम, नितीन उंदीरवाडे, लता लाटकर, राष्ट्रवादीच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सोनाली पुन्यपवार, हसन गिलानी, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. टी. मसराम, श्रीकृष्ण कानपुरे, विलास कोडाप, पांडुरंग घोटेकर, प्रकाश ताकसांडे, पंकज गुड्डेवार, डॉ.भारत खटी, चंद्रशेखर भडांगे, श्रीकृष्ण कावनपुरे, गजेंद्र डोमळे, रियाज शेख, विलास भांडेकर, संजय शिंगाडे, विवेक बाबनवाडे आदी उपस्थित होते. भारत हा शांतताप्रिय देश आहे. याचा गैरफायदा आतंकवादी संघटनांकडून घेतला जात असेल तर त्याला जशास तसे उत्तर देण्याची ताकद भारतामध्ये आहे. या हल्ल्याचे राजकारण न करता अशा प्रकारचे हल्ले पुन्हा होणार नाही यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या कामात शासन व संरक्षण दलाला मदत करण्याची गरज आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
दहशतवादी हल्ल्याचा सर्वपक्षांतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:30 PM