वनाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : इंद्रावती नदीतून चोरीदेचलीपेठा : अहेरी तालुक्याच्या देचलीपेठा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या जंगल परिसरात मौल्यवान सागवानची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र वनपरिक्षेत्राधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून देचलीपेठा भागात सागवान तस्करी सुरू आहे. कारवाई होत नसल्याने तस्कर निर्ढावलेले आहे. देचलीपेठापासून एक किमी अंतरावर असलेल्या इंद्रावती नदीपात्रातून सागवानचे मोठे ओंडके वाहून नेले जात आहे. पावसाळ्याच्या दिवसात वन विभागाची मोहीम थंडबस्त्यात राहत असल्याने सागवान तस्करांचे फावले आहे. देचलीपेठा येथील वनपरिक्षेत्राधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने सागवान तस्करी वाढली आहे. देचलीपेठाचे वनपरिक्षेत्राधिकारी देचलीपेठापासून २० किमी अंतरावर असलेल्या जिमलगट्टा येथे निवासी राहतात. काही वनकर्मचारीही अप-डाऊन करीत असतात. याचा फायदा घेऊन सागवान तस्करी पावसाळ्याच्या दिवसात सक्रीय झाले आहेत. (वार्ताहर)
देचलीपेठा भागात सागवान तस्करी सुरूच
By admin | Published: September 15, 2016 1:58 AM