आॅनलाईन लोकमतगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जवळपास २० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड केली जाते. या पिकांसाठी दरवर्षी काही शेतकरी कर्ज उचलत होते. यावर्षी मात्र शेतकºयांनी पाठ फिरविली असून केवळ सात शेतकºयांनी रब्बीचे कर्ज उचलले आहे.रब्बी पिकाचे सर्वसाधरण क्षेत्र २० हजार हेक्टर असले तरी सिंचनाच्या सुविधा वाढत चालल्या असल्याने रब्बीचे क्षेत्र वाढत चालले आहे. विशेष करून देसाईगंज, चामोर्शी, सिरोंचा या तालुक्यांमध्ये रब्बी पिकांची लागवड केली जाते. रब्बी हंगामासाठी बँका पीक कर्ज उपलब्ध करून देत असल्याने शेतकरी बँकांकडून कर्ज घेण्यास अधिक पसंती दर्शवितात. दरवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०१७ च्या रब्बी हंगामात २५ कोटी ३८ लाख रूपये कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दरवर्षी जवळपास ५० लाख रूपयांचे कर्ज वितरित केले जात होते. यावर्षी मात्र नोव्हेंबर महिना सुरू असला तरी केवळ सात शेतकºयांना तीन लाख रूपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. दरवर्षीच्या तुलनेत कर्ज वितरणाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येते. कर्ज वितरित केलेल्या बँकांमध्ये बँक आॅफ इंडियाने पाच शेतकऱ्यांना दोन लाख रूपये, आयडीबीआय बँकेने दोन शेतकºयांना एक लाख रूपये एवढेच कर्ज वितरित केले आहे. उर्वरित बँकांकडे मागणीच झाली नसल्याने त्यांनी कर्जाचे वितरण केले नसल्याचे सांगण्यात येत आहे.देसाईगंज व सिरोंचा तालुक्यात उन्हाळी धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, अंकिसा भागात मिरची, मक्का या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या दोन्ही पिकांसाठी हजारो रूपयांचा खर्च येत असल्याने शेतकरी बँकांकडून पीक कर्ज घेत होते. यावर्षी मात्र कर्जाकडे पाठ फिरविली आहे.सिरोंचा, देसाईगंज, चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रसिरोंचा, देसाईगंज व चामोर्शी तालुक्यात सिंचनाच्या सर्वाधिक सुविधा आहेत. त्यामुळे या तिनच तालुक्यातून रब्बी पिकांचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. देसाईगंज व सिरोंचा तालुक्यात उन्हाळी धान पिकाची लागवड केली जाते. सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, अंकिसा भागात मक्का व मिरची पिकांची लागवड केली जाते. चामोर्शी तालुक्यातील शेतकरी सुद्धा रब्बी पिकांची लागवड करतात.कर्ज माफीमुळे शेतकºयांनी जुन्या कर्जाचा भरणा केलाच नाहीकर्ज माफीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. मागील वर्षी रब्बी हंगामाचे घेतले कर्ज माफ होईल, असा अनेक शेतकºयांचा गैरसमज झाला असल्याने शेतकºयांनी मागील वर्षी घेतलेले रब्बी हंगामाचे कर्ज भरले नाही. त्यामुळे त्या शेतकºयांनी नवीन कर्जाची सुद्धा मागणी केली नाही. परिणामी दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी कर्ज वितरणाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे.कर्ज माफ करण्याचे वारे मे महिन्यापासूनच सुरू झाले होते. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी मागील वर्षीच्या खरीप हंगामाच्या कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे त्यांनाही कर्ज उचलता आले नाही. खरीप हंगामात १९४ कोटी ६२ लाख रूपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र केवळ ८४ कोटी ८२ लाख रूपयांचे कर्ज उचलले. कर्ज न उचललेल्या शेतकºयांनी पीक विमा सुद्धा काढला नाही.