स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याने राज्य सरकारच्या निषेधार्थ गडचिराेली शहरातील इंदिरा गांधी चाैकात गुरुवारी आक्राेश आंदाेलन करण्यात आले. यावेळी आ. डाॅ. देवराव हाेळी, आ. कृष्णा गजबे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, प्रमोद पिपरे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील पारधी, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तथा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, नगराध्यक्ष योगिता पिपरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा योगिता भांडेकर, जिल्हा संपर्कप्रमुख सदानंद कुथे, गडचिरोली शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपा नेते रमेश भुरसे, अनिल पोहनकर, मोतीलाल कुकरेजा, ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री भास्कर बुरे, आशिष पिपरे, गडचिरोली तालुक्याचे अध्यक्ष रामरतन गोहणे, चामोर्शी तालुक्याचे अध्यक्ष दिलीपजी चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, विनोद गौरकार, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष दुर्गाताई काटवे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ओबीसींचे आरक्षण रद्द होण्यास ठाकरे सरकार जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:27 AM