शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

१४२ किमीच्या महामार्गाने येणार ‘समृद्धी’, जिल्ह्याची वाढणार कनेक्टिव्हिटी

By दिलीप दहेलकर | Published: December 31, 2023 8:39 PM

राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ६०० किमीमध्ये लांबीच्या अंतरात पूर्ण झाला असून वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे.

गडचिराेली : राज्याची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर पर्यंत ६०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आता भंडारा ते गडचिरोली या दुसऱ्या टप्प्यातील समृद्धी महामार्गाच्या अंतिम आखणीस मान्यता प्रदान करण्यात आली असून राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या महामार्गाचे काम करणार आहे. रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, सुरजागड लाेहप्रकल्प व आता समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून जिल्हा विकासाकडे गतीने झेपावत आहे. शेवटच्या टोकावरील मागास गडचिरोली आतापर्यंत उद्योगविरहित जिल्हा म्हणून परिचित होता, पण आता मोठमोठे प्रकल्प येत आहेत.

राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ६०० किमीमध्ये लांबीच्या अंतरात पूर्ण झाला असून वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. उर्वरित लांबीचा महामार्गही लवकरच वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या पुर्व व पश्चिम सीमा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने जोडण्याच्या दृष्टीने, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार नागाूर पासून भंडारा ते गडचिराेलीपर्यंत करण्याचे नियाेजन हाेते.राज्याच्या पुर्व विभागातील भंडारा गाेंदिया, गडचिराेली व चंद्रपूरपर्यत करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आले आहे. सदर द्रुतगती महामार्गाचा विकास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने २७ डिसेंबर २०२३ रोजी परीपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

दळणवळण व पर्यटन विकासाला मिळणार चालना

नागपूर, भंडारा ते गडचिराेली अशा समृद्धी महामार्गाने गडचिराेली जिल्हयात दळणवळण व पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.सदर मार्ग करण्याचा मुख्य उद्देश नागपूर शहराला गडचिरोली, भंडारा आणि पुढे मुंबईशी प्रवेश राज्याचा नियंत्रित द्रुतगती महामार्गाने जोडणे, राज्याच्या पूर्व आणि पश्चिम सीमांना द्रुतगती महामागनि जोडणे, हिंदू देशाच्या उत्तर आणि ईशान्येकडील मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांशी ठाकरे द्रुतगती महामार्गाद्वारे आंतरराज्यीय संपर्क स्थापित करणे हा आहे. पूर्व महाराष्ट्रातील अल्प विकसित जिल्ह्यांचा सामाजिक आर्थिक विकास होईल. पायाभूत सुविधांचा लाभ आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी हाेणार आहे.

असे जाणार मार्ग

'भंडारा - गडचिरोली - १४२ किलोमीटरनागपूर चंद्रपूर - १९४ किलोमीटरनागपूर - गोंदिया - १६२ किलोमीटर

दाेन मार्ग आरमाेरीत जाेडणारदुग्गीपार - काेरेगाव - गाेंदिया हा ७५३ क्रमाकांचा ४४ किमीचा राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आला आहे. याच धर्तीवर भंडारा - गाेंदिया व देसाईगंज ते आरमाेरी असा समृद्धी महामार्ग तयार करण्यात येणार आहे. दुसरीकडे नागपूरपासून भंडारा ते गडचिरोली हा समृद्धी महामार्ग तयार करण्यात येणार आहे. सदर दाेन्ही समृद्धी महामार्ग आरमाेरी येथे जाेडून ताे पुढे गडचिराेलीला जाेडणार आहे, अशी माहीती आमदार डाॅ. देवराव हाेळी यांनी ‘लाेकमत’ शी बाेलताना दिली.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग