शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

शाळेची सुरुवात ठरली अखेरची; चिमुकल्याला ट्रकने चिरडले!

By गेापाल लाजुरकर | Published: July 04, 2024 1:02 AM

ही हृदयद्रावक घटना बुधवार, ३ जुलै राेजी तालुक्याच्या वसा येथे घडली.

गडचिराेली : नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. अवघे दाेन दिवसच शाळेत मित्रांसाेबत घालविले. तिसऱ्याही दिवशी त्याच उमेदीने ताे गावापासून १ किमी अंतरावरच्या दुसऱ्या गावातील शाळेत गेला. संपूर्ण दिवस शाळेत घालविला. सायंकाळी सुटी झाली व गावातीलच एका मित्रासाेबत एकाच सायकलवर बसून गावाकडे निघाला. गावालगत पाेहाेचला खरा; पण नियतीला काही वेगळेच मान्य असावे. मागील बाजूने येणाऱ्या भरधाव ट्रकने जाेरदार धडक दिली. यात चिरडून त्याचा मृत्यू झाला.

ही हृदयद्रावक घटना बुधवार, ३ जुलै राेजी तालुक्याच्या वसा येथे घडली. ऋतुराज प्रशांत शिवणकर (११, रा. वसा), असे जागीच ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. १ जुलैपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. पाठ्यपुस्तके मिळतात म्हणून मुले पहिल्या दिवशीपासूनच शाळेत जातात. कुणी डेस्क-बेंच पकडतात, तर कुणाला जुन्या मित्रांना भेटण्याची ओढ लागलेली असते. अशाच ओढीने ऋतुराज हा पहिल्या दिवशीपासूनच वसा जवळच्या पाेर्ला येथील शिवाजी हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीत जाऊन अवघे दाेनच दिवस उलटले हाेते. गप्पागाेष्टीत शाळेतील तिसराही दिवस संपला.

सायंकाळी सुटी झाल्यानंतर एका मित्रासाेबत ताे स्वत: सायकल चालवत गावाकडे निघाला. पाेर्लापासून अवघ्या एका किमी अंतरावर गडचिराेली-आरमाेरी राष्ट्रीय महामार्गावर त्याचे गाव. गावाच्या फाट्याजवळ पाेहाेचला. आता गावाच्या रस्त्याने सायकल वळवणार ताेच गडचिराेलीकडून आरमाेरीकडे जाणाऱ्या भरधाव वाहनाने मागील बाजूने सायकलला धडक दिली.यात त्याचा मित्र बाजूला फेकला गेला तर ऋतुराज हा ट्रकच्या चाकाखाली आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात पाेहाेचताच गर्दी उसळली. लगेच पाेलिसांनाही कळविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नाेंदविण्याची प्रकिया सुरू हाेती.

एकुलता एक हिरावला, कुटुंब शाेकमग्नप्रशांत शिवणकर यांना ऋतुराज हा एक मुलगा हाेता व त्यापेक्षा लहान मुलगी आहे. आपल्या मुलाला ट्रकने चिरडल्याची माहिती हाेताच शिवणकर कुटुंब शाेकसागरात बुडाले. एकुलत्या मुलाच्या जाण्याने नातेवाइकांच्याही अश्रूंचा बांध फुटला.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूSchoolशाळा