शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार, उद्यापासून स्वाक्षरी मोहीम, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा
2
“राहुल गांधी संविधान घेऊन सगळीकडे जातात, पण कोर्टाचे आदेश पाळत नाहीत”; कुणी केली टीका?
3
“गरज सरो, वैद्य मरो हा भाजपाचा धर्म”; बच्चू कडू यांची टीका
4
यूपी गेट, चिल्ला बॉर्डरवर प्रचंड वाहतूक कोंडी… चर्चा निष्फळ झाल्यास शेतकरी दिल्लीकडे कूच करणार! 
5
“उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले”; काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा
6
बापरे! लग्नमंडपात शिरला कुत्रा, घातला धुमाकूळ, नवरा-नवरीची पळापळ, अन् मग... (Video)
7
सुखबीर सिंग बादल यांना शिक्षा; सुवर्ण मंदिरातील शौचालय आणि भांडी साफ करण्याचे आदेश
8
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला केली खास विनंती
9
"तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, शिंदेंना मी आधीच सांगितलं होतं’’, या नेत्यानं केला दावा  
10
स्टीलनंतर आता ईव्ही मार्केटमध्ये JSW Group उतरणार, Tata-Mahindra ला देणार टक्कर!
11
INDU19 vs JPNU19 : भारतीय संघानं २११ धावांनी जिंकला सामना; जाणून घ्या सेमीचं समीकरण
12
जुळून येती रेशीमगाठी! मालिकेच्या सेटवर जमल्या जोड्या, बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते?
13
“निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले
14
"देवीने स्वप्नात येऊन सांगितलं, बळी द्या म्हणजे मुलगा बरा होईल", त्यानंतर घडलं भयानक...  
15
“शेवटी भाजपा सांगेल तेच आता करावे लागणार”; मनसे नेत्याची एकनाथ शिंदेवर टीका
16
बांगलादेशमधील हिंदूंसाठी ठाकरे गट आक्रमक, प्रियंका चतुर्वेदींचं थेट मोदींना पत्र, केली अशी मागणी 
17
धक्कादायक! फुटबॉल मॅचमध्ये तुफान राडा, चाहते भिडले, हाणामारीत १००हून जास्त लोकांचा मृत्यू (Video)
18
भाजपाचा विधिमंडळ गटनेता कोण, निर्मला सीतारमन आणि रूपानींच्या उपस्थितीत होणार निर्णय
19
एकनाथ शिंदे नाराज होणं स्वाभाविक, त्यांच्यावर 'ही' जबाबदारी सोपवा; आठवलेंची नवी मागणी
20
Video कॉलने ९० वर्षीय आजोबांच्या आयुष्यात वादळ! आयुष्यभरात कमावलेले १.१५ कोटी गायब

नालीत आढळला अभियंत्याचा मृतदेह; मृत्यूचे कारण अस्पष्ट

By दिगांबर जवादे | Published: November 29, 2024 5:15 PM

Gadchiroli : पाणीपुरवठा विभागात हाेते कार्यरत

गडचिराेली : शहरातील मूल मार्गावरील रिलायन्य पेट्राेलपंपाच्या अगदी समाेर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या नालीत शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अभियंत्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. मृतदेह बघण्यासाठी शहरातील नागरिकांनी माेठी गर्दी केली हाेती. घातपाताचीही शक्यता काही जणांनी व्यक्त केली आहे.

धनपाल भलावी (४०) असे मृतकाचे नाव असून ते जिल्हा परिषदेच्या सिराेंचा येथील पाणीपुरवठा विभागात अभियंता म्हणून कार्यरत हाेते. ते मुळचे गाेंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील रहिवासी हाेत. त्यांचे कुटुंब गडचिराेली येथील आयटीआय परिसरातील पंचवटी नगरात भाड्याने राहत हाेते. भलावी हे बुधवारपासून बेपत्ता हाेते. दरम्यान त्यांच्या पत्नी रामटेक येथे नातेवाईकाकडे गेल्या हाेत्या. भलावी हे बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने गडचिराेली पाेलिस स्टेशनमध्ये दाखल केली हाेती. गडचिराेली शहरातील मूल मार्गावरील नालीत शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास एका व्यक्तीला नालीमध्ये मृतदेह पडला असल्याचे दिसून आला. मृतदेहाचे डाेके पाण्यात बुडाला असल्याने ओळख पटत नव्हती. दरम्यान भलावी यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली असल्याने मृतदेह त्यांचाच असू शकते, ही बाब पाेलिसांच्या लक्षात आली. पाेलिसांनी घटनास्थळी भलावी यांच्या नातेवाईकांना बाेलावले. त्यांनी ओळख पटवली. त्यानंतर पाेलिसांनी मृतदेह बाहेर काढला. स्थितीवरून भलावी यांचा मृतदेह दाेन दिवसांपूर्वीचा असल्याची शक्यता आहे. भलावी यांना दारू पिण्याचे व्यसन हाेते. यातच ते नालीत पडले, असावे अशी शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. त्यांनी जॅकेट घातला हाेता, यावरून घटना रात्रीची असावी. त्यांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला हे पीएम रिपाेर्ट व पाेलिस तपासात स्पष्ट हाेईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली