शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

चालकाची सटकली...बस रस्त्यात सोडून धूम ठोकली; विद्यार्थ्यांसह ४५ प्रवासी दोन तास ताटकळले

By संजय तिपाले | Published: December 19, 2023 7:32 PM

दुर्गम मद्दीगुडममधील प्रकार

गडचिरोली: विद्यार्थ्यांसह प्रवाशांना घेऊन निघालेली बस वाटेत आदळली, चालक बस वाकडीतिकडी चालवित असल्याने प्रवासी ओरडले. त्यानंतर चालकाचा पारा चढला व बस वाटेतच थांबवली. बससहवाहक व प्रवाशांना तेथेच सोडून चालक दुचाकीस्वाराची लिफ्ट घेऊन परतला. यामुळे ४५ प्रवाशांना दोन तास ताटकळावे लागले. अहेरी तालुक्यातील मद्दीगुडम या दुर्गम गावाजवळ १८ डिसेंबरला सायंकाळी हा प्रकार घडला.

दुर्गम, अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाशाळेत ये- जा करण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी मानव विकास मिशनमार्फत एसटी महामंडळाला बस दिलेल्या आहेत. या बस सामान्य प्रवाशांनाही सेवा देतात. दरम्यान, १८ डिसेंबर रोजी अहेरी आगारातून मानव विकास मिशनची बस (एमएच ४० वाय- ५६०१) विद्यार्थी व इतर प्रवाशांना घेऊन चालक चंदू कोयेड्डी हा आलापल्ली - एटापल्ली मार्गे बोलेपल्लीला निघाला हाेता. सायंकाळी पाच वाजता बस मद्दीगुडम गावाजवळील सुरजागड लोहप्रकल्पाच्या डंपींग ग्राऊंडलगत पोहोचली.

यावेळी बसमध्ये ४५ प्रवासी होते. चालकाचे नियंत्रण सुटले व खड्ड्यात बस आदळली, शिवाय बस वाकडीतिकडी धावत असल्याने प्रवाशांनी आक्षेप घेतला. त्यावर चालकाने बस थांबवली. चालक व बसमधील प्रवाशीही खाली उतरले. त्यानंतर चालक व प्रवाशांत किरकोळ शाब्दिक चकमक उडाली. तेथून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला हात दाखवून चालक अहेरीला निघून गेला. इकडे बससह वाहक व प्रवाशी वाटेतच ताटकळले. अखेर काही प्रवाशांनी खासगी वाहनातून आपले गाव जवळ केले तर काहींनी दुसऱ्या बसमधून पुढचा प्रवास केला. वाहकाने संपर्क करुन दुसरा चालक बोलावला, त्यानंतर बस अहेरीला नेली.

निलंबनाचा प्रस्ताव पाठविणारयाबाबत अहेरीचे आगार व्यवस्थापक चंद्रभूषण घागरगुंडे यांना संपर्क केला असता त्यांनी घडल्या प्रकाराला दुजोरा दिला. संबंधित चालकाने असे का केले, याचे कारण अस्पष्ट आहे, पण घडला प्रकार चुकीचा आहे. प्रवाशांना चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न आहे.या बसवरील वाहकाचा जबाब नोंदविला जाईल, त्यानंतर चालकाच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली