- गाेपाल लाजूरकर गडचिराेली : मानव विकास मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी सिराेंचा ते आसरअल्ली या रस्त्यावर धावणाऱ्या बसचे फॅनबेल्ट राजीवनगर गावाजवळ बुधवारी सकाळी ११ वाजता अचानक तुटले. बस बंद पडली. चालकाने प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण मिळवल्याने सर्व विद्यार्थी व प्रवासी बाहेर पडले. खाली उतरून पाहिले असता बसच्या इंजिनमधून धूर निघत हाेता. इंजिन अधिक गरम झाले असते तर बस पेट घेण्याचा धाेकासुद्धा हाेता.
सिराेंचा तालुक्यात अहेरी आगारातून प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांसाठी बसफेऱ्या साेडल्या जातात. दररोज दोन बसफेऱ्या असल्याने तेथे विद्यार्थी व प्रवाशांची माेठ्या प्रमाणात गर्दी असते. बुधवारी आसरअल्ली मार्गे साेडलेली बस भंगार हाेती. ही बस अचानकपणे राजीवनगर गावाजवळ या बसचे फॅन बेल्ट तुटल्याने बस अचानक रस्त्यावर बंद पडून बसमधून धूर निघू लागल्याने बसमधील शालेय विद्यार्थ्यी वप्रवासी भीतीने बसमधून बाहेर पडण्याची घाई करीत हाेते. अनेकजण घाईघाईने जीव मुठीत घेऊन खाली उतरले काही वेळ प्रवासी व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र बसचे चालक व वाहकांनी सहकार्य केले.
सिराेंचा तालुक्यात भंगार बसेस वाहतुकीवरअंकिसा व आसरअल्ली परिसरातील शालेय विद्यार्थी सिराेंचा येथे शिक्षणासाठी येतात. ते दरराेज बसने प्रवास करतात. सिरोंचा तालुक्यातील रस्ते दुरवस्थेत आहेत. शिवाय महामंडळाच बसेससुद्धा भंगार आहेत. तरीही याच भागात भंगार बसेस साेडल्या जातात. यामुळे अपघाताची शक्यता असल्याने नवीन बसेस साेडाव्या, अशी मागणी पालक करीत आहेत.