शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सूर्य ओकतेय आग, जरा जपून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 5:00 AM

रविवारी तापमान ४२ अंशांपर्यंत पाेहाेचले. या रखरखत्या उन्हात घराबाहेर पडणे शक्य नसल्याने, दुपारी १२ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत गडचिराेली शहरातील रस्ते ओस पडल्यागत दिसून येत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात माेठ्या प्रमाणात वाढ हाेते. त्यामुळे २५ तारखेनंतरच्या दिवसांना नवतपा असे संबाेधल्या जाते. या नवतपांपैकी चार ते पाच दिवस अत्यंत कडक उन्ह राहते.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : ढगाळ वातावरण नाहीसे हाेऊन आकाश निरभ्र झाल्याने, मागील दाेन दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. रविवारी तापमान ४२ अंशांपर्यंत पाेहाेचले. या रखरखत्या उन्हात घराबाहेर पडणे शक्य नसल्याने, दुपारी १२ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत गडचिराेली शहरातील रस्ते ओस पडल्यागत दिसून येत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात माेठ्या प्रमाणात वाढ हाेते. त्यामुळे २५ तारखेनंतरच्या दिवसांना नवतपा असे संबाेधल्या जाते. या नवतपांपैकी चार ते पाच दिवस अत्यंत कडक उन्ह राहते. त्यामुळे तापमानात वाढ हाेते. चार दिवसांपूर्वी काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला, तसेच ढगाळ वातावरण असल्याने तापमान ४० अंशांपर्यंत पाेहाेचले हाेते. शनिवारपासून आकाश निरभ्र झाले.

 काय काळजी घ्यावी 

-    सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असते. त्यामुळे या कालावधीत शक्यताे उन्हात फिरणे, काम करणे किंवा खेळणे टाळावे. -    साैम्य रंगाचे सैल कपडे वापरावे, टाइट जिन्स आणि भडक कपडे वापरू नयेत. डाेक्यावर रुमाल किंवा स्कार्प बांधावा. तहान लागण्याची वाट न पाहता पाणी प्यावे. नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, लिंबूपाणी घ्यावे. 

पुन्हा आठ दिवस उष्णतेचेमान्सूनचे वेळेवर आगमन न झाल्यास पुन्हा आठ दिवस तापमान ४० अंशांच्या वरच राहणार आहे. पाऊस झाल्यानंतरही वातावरणातील दमटपणा त्रासवून साेडणार आहे. त्यामुळे उन्हापासून काळजी घेण्याची गरज आहे.

११ नंतर काम बंद

ग्रामीण भागात शेतीपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. सकाळी ९ वाजल्यानंतरच उकड उन्ह पडत असल्याने,  सकाळच्या सुमारास कामे उरकण्याला शेतकरी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी ६ वाजता शेतात पाेहाेचून ११ वाजेपर्यंत कामे केली जातात. त्यानंतर, घराकडे परत येतात. शहरात बांधकाम मजूर सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत काम करतात. त्यानंतर कायमची सुटी घेतली जाते. 

उष्माघाताचा धाेकाबाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढले की, शरीरातील तापमान नियंत्रण करणारी यंत्रणा काेलमडते, अशा व्यक्तीला उष्माघात म्हणजेच हिटस्ट्राेक किंवा सन स्ट्राेक हाेताे. ही जीवघेणी अवस्था आहे. वातावरणातील जास्त तापमान किंवा खूप वेळ उन्हामध्ये शारीरिक कष्ट केल्याने ही अवस्था निर्माण हाेते. उष्माघातामुळे मृत्यू ओढवताे. 

 

टॅग्स :Temperatureतापमान