शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
2
"काँग्रेसला १०० पेक्षा जास्त जागा मिळतील"; वडेट्टीवारांच्या विधानावर राऊत म्हणाले, "तुम्ही मेरिटवर बोलत असाल तर..."
3
भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात; पक्षाच्या खासदारांनीच मागितला राजीनामा
4
उमेदवार जाहीर करण्याबाबत महायुतीने घेतली आघाडी; लोकसभा निवडणुकीपासून घेतला बोध!
5
Waaree Energiesचा IPO अलॉट झालाय का? 'इकडे' करू शकता स्टेटस चेक; पैसे दुप्पट होण्याची शक्यता
6
'गजनी २'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात! आमिर खानसोबत दिसणार साऊथमधील 'हा' मोठा सुपरस्टार
7
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
8
Free LPG Cylinder: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारनं दिली भेट, १.८४ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर
9
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
10
का महाग मिळतं Personal Loan; कार, होम लोनवर का कमी लागतं व्याज? समजून घ्या गणित
11
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
12
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
13
"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही
14
काळवीटाच्या शिकारीनंतर सलमानने बिश्नोई समाजाला दिलेली पैशांची ऑफर? लॉरेन्सच्या भावाचा मोठा खुलासा, म्हणाला...
15
Diwali 2024 लक्ष्मी पूजन ३१ ऑक्टोबर की ०१ नोव्हेंबरला? तारखेबाबत संभ्रम; पाहा, शुभ मुहूर्त
16
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
17
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
18
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
19
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
20
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!

सीटी-1 नावाची दहशत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 11:18 PM

सीटी-१ या वाघाने गडचिरोली जिल्ह्यात सहा मानवी शिकार केल्या आहेत. त्यात पहिली शिकार वडसा वनपरिक्षेत्रात १४ एप्रिल रोजी, दुसरी याच क्षेत्रात ३ मे रोजी, तिसरी आरमोरी क्षेत्रात १६ जून रोजी, त्यानंतर २६ आणि २९ जूनला पोर्ला क्षेत्रात, तर ८ सप्टेंबरला वडसा वनपरिक्षेत्रात शिकार केली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा लाखांदूरकडे वळविला होता. पुन्हा तो वडसा क्षेत्रात आला होता. पण पुढील मानवी शिकार होण्याआधीच तो वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज/आरमोरी : गेल्या दहा महिन्यांपासून पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत आपली दहशत निर्माण करत १३ लोकांच्या अकाली मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सीटी-१ या वाघाला पकडण्यात यश आल्याने त्याच्या नावाची दहशत अखेर संपली. असे असले तरी टी-६ या नरभक्षी वाघिणीसह इतर वाघांचे अस्तित्व कायम असल्यामुळे नागरिकांना यापुढेही योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे राहणार आहे.  मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातून आलेल्या सीटी-१ वाघाचे हल्ले गेल्या काही दिवसात वाढले होते. त्यामुळे त्याला जेरबंद करण्यासाठी  तिन्ही जिल्ह्यात विविध ठिकाणांहून बोलविलेल्या रेस्क्यू टीमला तो हुलकावणी देत होता.  वाघाला जेरबंद करण्यासाठी अनेकदा बेट लावून सापळे रचण्यात आले होते; मात्र तो एका ठिकाणी स्थिर राहात नसल्याने  वनविभागाने लावलेल्या जाळ्यात तो अडकत नव्हता. जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून वनविभागाचे अधिकारी व  कर्मचारी त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. ज्या भागात हा वाघ जात होता त्या भागातील जवळपासच्या गावात जाऊन वनविभागाचे कर्मचारी लोकांना जंगलात न जाण्याविषयी सांगत होते, मुणारी देत होते. वडसा वनविभागातील आरमोरी, पोराला व वडसा या तिन्ही वनपरिक्षेत्रात या वाघाने हल्ले करून सहा जणांचा बळी घेतला. मात्र  कित्येकदा शिकार केलेल्या ठिकाणी सापळा रचूनही तो जाळ्यात अडकत नव्हता. त्यामुळे सदर वाघाने वनविभागाची झोप उडविली होती.

अशा केल्या सीटी-१ने सहा मानवी शिकारसीटी-१ या वाघाने गडचिरोली जिल्ह्यात सहा मानवी शिकार केल्या आहेत. त्यात पहिली शिकार वडसा वनपरिक्षेत्रात १४ एप्रिल रोजी, दुसरी याच क्षेत्रात ३ मे रोजी, तिसरी आरमोरी क्षेत्रात १६ जून रोजी, त्यानंतर २६ आणि २९ जूनला पोर्ला क्षेत्रात, तर ८ सप्टेंबरला वडसा वनपरिक्षेत्रात शिकार केली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा लाखांदूरकडे वळविला होता. पुन्हा तो वडसा क्षेत्रात आला होता. पण पुढील मानवी शिकार होण्याआधीच तो वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

वारंवार सापळे लावूनही येत नव्हते यश-    तिन्ही जिल्ह्यातील रेस्क्यू टीमला अनेक महिन्यांपासून गुंगारा देणारा हा वाघ अतिशय चतुर आहे. १७ डिसेंबर २०२१ रोजी चिमूर वनपरिक्षेत्रात या वाघाचे पहिली मानवी शिकार केली होती. मात्र अलीकडच्या काही दिवसात त्याच्या मानवी शिकारीचे प्रमाण वाढतच होते. वारंवार सापळे लावूनही तो सापडत नसल्याने वनविभागाचे टेन्शनही वाढले होते. शेवटी आठ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले.

नागरिकांनी जंगलात जाणे टाळावेअनेक लोकांचा बळी घेणाऱ्या सीटी-१ या वाघाला जेरबंद करण्यात यश आले असले तरी नागरिकांनी बिनधास्तपणे जंगलात जाण्याचे टाळावे. वडसा आणि गडचिरोली वनविभागात  इतर वाघांचा वावर असल्याने  लोकांनी जंगलात जाणे टाळावे, असे आवाहन गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी केले आहे.

 

टॅग्स :Tigerवाघ