शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

चोरीकांडाचा सूत्रधार आठ वर्षांपूर्वीचा आरोपी

By admin | Published: September 28, 2016 2:26 AM

गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह परराज्यीय खुल्या बाजारात चोरीच्या दुचाकी विक्री करणाऱ्या त्रिकुटातील प्रमुख सूत्रधार

सिरोंचा दुचाकी प्रकरण : खंडणी प्रकरणातही होता समावेशसिरोंचा : गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह परराज्यीय खुल्या बाजारात चोरीच्या दुचाकी विक्री करणाऱ्या त्रिकुटातील प्रमुख सूत्रधार हा गडचिरोली पोलीस दलातील माजी शिपाई आहे. ६ आॅगस्ट २००८ रोजी गुरूवारला सीमावर्तीय आंध्रच्या अंबडपल्ली येथे एका सरपंच महिलेस पिस्तुलाचा धाक दाखवून ५० हजाराची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली महादेवपूर पोलिसांनी त्याला अटक केली होती. सदर मुख्य आरोपीचे नाव मधुकर समय्या तुलसीगारी (३३) असून तो सिरोंचा येथील रहिवासी आहे. प्रस्तुत घटनेच्या कालावधीत तो एटापल्ली तालुक्यातील कसनसूर उपपोलीस ठाण्यात कार्यरत होता. पोलीस कारवाईच्या पुढील टप्प्यात सिरोंचा येथील त्याच्या राहत्या घरून सरकारी पिस्तुल जप्त करण्यात सिरोंचा पोलिसांनी यश मिळविले. येथेही त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला. तपासकार्याच्या घटनाक्रमादरम्यान कसनसूर ठाण्यातही गुन्हा नोंद झाला. अंबडपल्लीच्या सरपंच सुलोचना कृष्णाराव तोपुचेर्ला यांच्या घरात रात्री अनधिकृत प्रवेश करून ५० हजार रूपयांची खंडणी मागितली. यावेळी त्याचा अन्य साथीदार रमेश अंकुलू नारम सोबत होता. मात्र तो पळून गेला. तथापी सिलोचना यांनी मधुकरसह त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.८ आॅगस्ट २००८ रोजी महादेवपूर पोलीस ठाण्यात मधुकर तुलसीगारी विरूध्द अपराध संख्या ६३/०८ भादंविचे कलम ४४८, ३८५, ५०६, ३४ अन्वये गुन्हा पंजीबध्द झाला. सिरोंचाचे तत्कालीन प्रभारी अधिकार रघुनाथ नाचन व पोलीस उपनिरिक्षक सुरेश चिल्लावार यांनी मधुकर कडून सरकारी पिस्तुल, १० जीवंत काडतूस जप्त करून ११ आॅगस्ट रोजी भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, २७ नुसार गुन्हा दाखल केला. कसनसूरचे प्रभारी पोलीस अधिकारी मुरलीधर खोकले यांनी तुलसीगारी विरूध्द ९ आॅगस्ट २००८ रोजी भादंविचे कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.विभागीय चौकशीच्या पुढील टप्प्यात भारतीय संविधानाच्या कलम ३११ ब अन्वये मधुकर तुलसीगारीला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. या शास्तीविरूध्द त्याने महाराष्ट्र प्राधिकरण (मॅथ) येथे याचिका क्रमांक ४२४/२००९ दाखल केली. याचिकेचा निकाल एकतर्फी लागून १६ आॅक्टोबर २०१० अन्वये त्याला वेतन व भत्ते अनुज्ञेय करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)