भामरागड येथील पर्लकोटा नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. या पुलाच्या बांधकामात स्थानिक घरे आणि काही दुकाने पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन संकट येणार आहे. व्यापाऱ्यांना पर्यायी जागा उपलब्ध व्हावी यासाठी संघटनेकडून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, पुनर्वसन मंत्री, खासदार, आमदार आदींना निवेदन देऊन होणाऱ्या नुकसानीची जाणीव करून दिली. या घटनेला आठ महिन्यांचा कालावधी उलटला असूनसुध्दा अजूनपर्यंत मदत किंवा ठोस आश्वासन मिळाले नाही. आता तर पूल बांधकामास सुरुवात झाली आहे. रस्त्यालगतची संपूर्ण व्यापारपेठ ताेडली जाणार आहे. परिसरात काही दुकाने स्वतःच्या मालकीच्या जागेवर, तर काही दुकाने भाडेतत्त्वावर घेऊन अनेकजण व्यवसाय करीत आहेत. या परिसरातील जवळपास १२० दुकाने तोडली जाणार आहेत. त्यामुळे पुढील जीवन जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागणी मान्य न झाल्यास २८ जूनराेजी चक्का जाम व बाजारपेठ बंद आंदाेलन करण्यात येणार, असा इशारा व्यापारी संघटनेने तहसीलदार अनमाेल कांबळे यांच्यामार्फत शासनाला पाठविलेल्या निवेदनातून दिला.
===Photopath===
240621\062820210623_114937.jpg
===Caption===
व्यापारी संघटने कडुन तहसीलदार कडे निवेदन देताना