शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची गोपनीय कागदपत्रे लीक; इस्रायल कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याची शक्यता
2
धक्कादायक खुलासा! वृक्ष, जमीन, समुद्राने कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेणे थांबविले; कोणत्या संकटाची चाहूल...
3
“महायुती CMपदाचा चेहरा जाहीर करायला घाबरते, जनतेच्या पैशावर भाजपाचा प्रचार”; काँग्रेसची टीका
4
एकीकडे सलमान खानला धमक्या, तिकडे अर्पिता खानने विकला बांद्रामधला कोटींचा फ्लॅट
5
IND vs NZ : बुमराहचा भेदक मारा, टॉम लॅथमच्या पदरी भोपळा; सेटअप करून अशी घेतली विकेट (VIDEO)
6
गाढ झोपेत असताना काळाचा घाला! राजस्थानमध्ये लक्झरी बस-टेम्पोमध्ये भीषण अपघात; ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू
7
Adah Sharma: सुशांतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्यासाठी अदा शर्माला माराव्या लागल्या कोर्टात चकरा, म्हणाली...
8
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ योग, कामात उत्तम यश; फायद्याचा आनंदी दिवस
9
विधानसभा निवडणूक: जागावाटपावर खलबते! मविआची चर्चा ट्रॅकवर, महायुतीचेही ठरले...
10
एकता कपूर आणि तिच्या आईविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, 'गंदी बात' भोवली! नेमकं प्रकरण काय?
11
Bigg Boss 18 च्या सेटवर सलमान खान भावुक! म्हणाला- "मला इथे यायचं नव्हतं पण..."
12
विशेष लेख: अतुल परचुरे... तो आहे आमच्याबरोबर, आम्ही असेपर्यंत...
13
हिंदूंचे नेतृत्व कुणाकडे? सुभाष वेलिंगकराचे प्रकरण अन् RSS, VHP, भाजपाची सावध भूमिका
14
संकष्ट चतुर्थी: चंद्रोदयाची वेळ काय? व्रताचरण कसे करावे? पाहा, महत्त्व, मान्यता अन् महात्म्य
15
पिस्तूल, हत्यारे मिळतात तरी कशी? मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत वाटू लागली चिंता
16
गजकेसरी पंचराजयोगात संकष्ट चतुर्थी: ५ राशींना यश, सरकारी लाभ; प्राप्तीत वाढ, सर्वोत्तम काळ!
17
नववी, दहावी अभ्यासक्रमात ३ विषयांची भर; शेती, नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकामाचा समावेश
18
निवडणूक विशेष लेख: कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या; सत्तेची खुर्ची मात्र आम्हालाच द्या..!
19
बोन ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे काय? ही चाचणी कशी केली जाते? वाचा सविस्तर
20
कार्यालयीन वेळेनंतर चौकशी नाही; मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर EDचे परिपत्रक

आश्रमशाळा, वसतिगृहाच्या तब्बल १८ इमारती अपूर्ण

By admin | Published: June 19, 2016 1:18 AM

आदिवासी विकास विभागामार्फत अहेरी, भामरागड व गडचिरोली या तिन्ही प्रकल्प कार्यालयांतर्गत जिल्ह्यात एकूण ११ आश्रमशाळा व १२ वसतिगृह ....

गती मंदावली : सचिवांनी व्यक्त केली नाराजीगडचिरोली : आदिवासी विकास विभागामार्फत अहेरी, भामरागड व गडचिरोली या तिन्ही प्रकल्प कार्यालयांतर्गत जिल्ह्यात एकूण ११ आश्रमशाळा व १२ वसतिगृह अशा एकूण २३ इमारतीचे काम प्रस्तावित करण्यात आले. यापैकी ५ इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. आश्रमशाळा व वसतिगृह बांधकामात गती नसल्याने आदिवासी विकास विभागाचे सचिव रामगोपाल देवरा यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.आदिवासी विकास विभागाचे सचिव रामगोपाल देवरा यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आश्रमशाळा वसतिगृह बांधकाम तसेच आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नव्याने आश्रमशाळा व वसतिगृह इमारतीचे काम मंजूर करण्यात आले. इतर जिल्ह्याच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात आश्रमशाळा व वसतिगृह इमारत बांधण्याच्या कामात गती फार कमी आहे, असे सचिव देवरा यावेळी म्हणाले. आश्रमशाळा व वसतिगृह इमारत बांधकामाला गती देऊन आगामी शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी सर्व इमारती हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देशही सचिव रामगोपल देवरा यांनी बैठकीत दिले. ताडगाव, व्यंकटापूर, धानोरा, मोहली येथील आश्रमशाळा व वसतिगृहांच्या इमारती या आठवड्यात पूर्ण होतील, अशी माहिती बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी बैठकीत सचिव रामगोपाल देवरा यांना दिली. (स्थानिक प्रतिनिधी)