जिल्ह्यात तीन प्रकारच्या याेजना राबवून निराधारांना आर्थिक आधार दिला जात आहे. या याेजनांचे जिल्हाभरात एकूण १ लाख २९ हजार ९८५ लाभार्थी आहेत. प्रशासनाच्या वतीने निराधार याेजनेच्या या लाभार्थ्यांची नियमित पडताळणी केली जाते. त्यामुळे त्यासाठी वेगळे अशी शोधमोहिम राबविण्याची गरज नसल्याचे अधिकारी सांगतात. जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने निराधारांसाठी १० याेजना राबविल्या जातात. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान याेजना (इतर), निराधार अनुदान याेजना (अनुसूचित जाती), निराेधार अनुदान याेजना (अनुसूचित जमाती), श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त याेजना (इतर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती) तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन याेजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन व राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन याेजना आदींचा समावेश आहे. तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसाहाय्य याेजना आदी याेजनांचा समावेश आहे.
बाॅक्स...
याेजनेनिहाय लाभार्थी
संजय गांधी याेजना २३,४५१
श्रावणबाळ याेजना ६६,५३२
इंदिरा गांधी याेजना ३९,७५३
राष्ट्रीय कुटुंब लाभ याेजना २४५
एकूण १,२९,९८५
बाॅक्स...
परित्यक्त्यांना आधार
एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नी असलेल्या महिलेला साेडल्यावर त्या महिलेला परित्यक्ता संबाेधल्या जाते. अशा परित्यक्ता महिला जिल्ह्यात बऱ्याच आहेत. संजय गांधी याेजनेंतर्गत शेकडाे परित्यक्ता महिलांना मासिक अर्थसाहाय्य दिले जात आहे.
अनाथ
संजय गांधी याेजनेंतर्गत अनाथ लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. जिल्ह्यातील बऱ्याच अनाथ नागरिकांना या याेजनेंतर्गत महिन्याला अर्थसाहाय्य दिले जात असल्याने त्यांचा उदरनिर्वाह याेग्यरीत्या सुरू आहे.
घटस्फाेटित
लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी पतीकडून पत्नीला कायद्याने घटस्फाेट दिला जाताे. आधुनिक काळात वैचारिक मतभेद असल्यामुळे घटस्फाेटित महिलांची संख्या वाढली आहे. या महिलांना प्राधान्याने शासनाच्या निराधार याेजनेचा लाभ दिला जात आहे.
दिव्यांग
विविध प्रकारच्या दिव्यांग नागरिकांना संजय गांधी निराधार याेजनेचा लाभ प्राधान्याने दिला जात आहे. यामध्ये दिव्यांग विद्यार्थी, नागरिक, महिला, युवक-युवती आदींचा समावेश आहे.
विधवा
विवाहित महिलेच्या पतीच्या अकाली निधनानंतर संबंधित महिला विधवा हाेत असते. परिणामी अशा महिलांवर त्यांच्या मुलामुलींच्या पालणपाेषणाची व स्वत:च्या उदरनिर्वाहाची जबाबदारी येऊन पडते. अशा महिलांना सन्मानाने जगता यावे, याकरिता संजय गांधी निराधार याेजनेतून प्राधान्याने लाभ दिला जाताे. या लाभार्थ्यांची जिल्ह्यात माेठी संख्या आहे.
काेट....
केंद्र व राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर या निधीचे वितरण तहसील कार्यालयाला केले जाते. तहसीलस्तरावरून लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात निराधार याेजनेच्या मासिक एक हजार रुपयाची रक्कम थेट वळती केली जाते. दरम्यान, सर्व्हर डाऊन किंवा लिंक फेलची समस्या उद्भवली तर रक्कम जमा हाेण्यास विलंब हाेताे. गडचिराेली जिल्ह्यात याेजनांच्या लाभार्थ्यांची नियमित पडताळणी केली जाते. त्याअनुषंगांने लाभार्थ्यांची यादी अद्ययावत हाेत असते.
- भाऊसाहेब रामटेके, तहसीलदार (संगांयाे), गडचिराेली