शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

झिमेलावासीयांच्या यातना थांबता थांबेना, पर्यायी मार्गच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:26 AM

गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील तिमराम ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या झिमेला गावाजवळील पुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे गावकऱ्यांना यावर्षीही तालुकास्थळी जाण्यासाठी ...

गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील तिमराम ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या झिमेला गावाजवळील पुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे गावकऱ्यांना यावर्षीही तालुकास्थळी जाण्यासाठी नाल्याच्या पाण्यातून वाट काढण्याची कसरत करावी लागत आहे. दुसरा कोणताही पर्यायी मार्ग नसल्यामुळे झिमेलावासीयांच्या यातना सुरूच आहेत.

झिमेलाजवळच्या नाल्यावर पुलाची नितांत गरज असल्याच्या मुद्द्याकडे सर्वप्रथम ‘लोकमत’ने लक्ष वेधून लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी झिमेला पोचमार्गाच्या रस्त्याची पाहणी केली आणि त्या ठिकाणी पूल उभारणीला मंजुरी दिली. काही दिवसांतच पुलाचे बांधकामसुद्धा सुरू करण्यात आले. मात्र, कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे हे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे या पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची आशा मावळली आहे.

आता पावसाळा सुरू झाल्यापासून झिमेलावासीयांना त्या नाल्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुलाचे किंवा रपट्याचे बांधकाम करताना नियमानुसार ठेकेदाराकडून नागरिकांच्या रहदारीसाठी अडचण होऊ नये, यासाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करून देणे आवश्यक असते, मात्र ठेकेदाराने अशी कोणतीच व्यवस्था केली नाही. उन्हाळ्यात नाल्यात पाणी नसल्याने खोदकाम केलेल्या मातीवरून लोक येणे-जाणे करत होते, मात्र पावसाच्या पाण्याने सदर पुलाजवळ टाकून ठेवलेली माती पूर्णतः पाण्याने वाहून गेली. आता नाल्याच्या पाण्यातून जीव मुठीत धरून आणि कसरत करत पैलतीर गाठावे लागत आहे.

(बॉक्स)

अशा आहेत अडचणी

झिमेला हे गाव आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरून उत्तर दिशेला तीन ते चार किलोमीटर अंतरावर गाव आहे. त्या गावची लोकसंख्या सुमारे पाचशे ते सहाशे एवढी आहे. त्या गावात जिल्हा परिषद शाळासुद्धा आहे. गावात आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना तालुकास्थळी धाव घ्यावी लागते. आरोग्य उपकेंद्र मोसम येथे असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना झिमेला गावात सेवा देण्यासाठी अडचणी येत आहेत.

170721\img-20210713-wa0013.jpg

झिमेला vasiyancha ये जा करण्याचे यातना थांबता थांबेना....