लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : विविध राष्ट्रीयीकृत बँका, स्टाफ सिलेक्शन कमिशन व रेल्वे विभागाच्या विविध पदभरतीसाठी गडचिराेली जिल्ह्यात एकही ऑनलाइन परीक्षा केंद्र नाही. परिणामी येथील विद्यार्थ्यांना भरतीच्या परीक्षेकरिता चंद्रपूर व नागपूरला जावे लागते. मात्र, या गंभीर प्रश्नाकडे जिल्हा प्रशासनासह लाेकप्रतिनिधींचेही अक्षम्य दुर्लक्ष हाेत आहे.
गडचिराेली हा आदिवासीबहुल, मागास व नक्षलप्रभावित जिल्हा आहे. या जिल्ह्यात बेराेजगार युवक-युवतींची संख्या माेठी आहे. कारण येथे शासकीय नाेकरीच्या फार कमी संधी आहेत. शिवाय या जिल्ह्यात माेठे उद्याेगधंदे नाहीत. माेठ्या शहरातील कंपन्या जिल्ह्यात येऊन उद्याेग उभारणीबाबत उदासीन आहेत. गेल्या पाच-सात वर्षांपासून जिल्ह्यातील शेकडाे हुशार व हाेतकरू विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळल्याचे दिसू येत आहे.
बाॅक्स ......
पाेलीस भरतीची उमेदवारांना प्रतीक्षा
गडचिराेली जिल्ह्यात पाेलीस, वन विभाग तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या पदभरतीकडे येथील बेराेजगार उमेदवार व विद्यार्थी माेठ्या आशेने पाहत असतात. गेल्या सात ते आठ वर्षांत पाेलीस विभागात अनेकजण नाेकरीला लागले आहेत. मात्र, २०१९ सालापासून पाेलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. गेल्या चार-पाच वर्षांपासून अनेक युवक, युवती पाेलीस भरतीची तयारी करीत आहेत. मात्र, पाेलीस भरती प्रक्रियेच्या गेल्या तीन वर्षांपासून हालचाली दिसून येत नाहीत. तयारी करणाऱ्या उमेदवारांचा हिरमाेड झाला आहे.
बाॅक्स ....
शेकडाे अनुकंपाधारकही वेटिंगवरच
-विविध विभागांत अनुकंपाधारकांसाठी जागा राखीव ठेवल्या जातात. अनुकंपाधारकांची यादीही तयार झाली आहे. मात्र, गेल्या सात-आठ वर्षांपासून शासकीय नाेकरीच्या प्रतीक्षेत अनेक अनुकंपाधारक आहेत.
-जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी अनुकंपाधारकांची यादी अद्ययावत केली आहे. मात्र, अनुकंपाधारकांना सेवेत सामावून घेण्यात न आल्याने त्यांना विविध अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे.
-अनुकंपाधारकांच्या यादीत नाव असल्याने हक्काची शासकीय नाेकरी मिळणार या आशेवर महिला व पुरुष अनुकंपाधारक आहेत. त्याअनुषंगाने त्यांनी पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केले आहे.
काेट.....
मी गेल्या तीन-चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असून, आजवर अनेक परीक्षा दिल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच बँकिंग तसेच रेल्वेच्या परीक्षेसाठी नागपूर व चंद्रपूरला जावे लागले. गडचिराेली जिल्ह्यात विविध पदभरतीच्या ऑनलाइन परीक्षेचे केंद्र देण्यात यावे, अशी आम्हा विद्यार्थ्यांची मागणी आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
- हर्षद दहेलकर, विद्यार्थी
काेट....
मी गडचिराेली येथे राहून अभ्यासिकेत नियमित जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. शासकीय नाेकरी मिळवून कुटुुंबाचा आर्थिक आधार हाेणे, हा माझा उद्देश आहे. गडचिराेली जिल्ह्यात स्थानिक स्तरावरील भरती प्रक्रियेसाठी परीक्षा केंद्र आहेत. मात्र, राष्ट्रीयीकृत बँका, रेल्वे भरतीच्या परीक्षेची साेय नाही.
- मयूर चिचघरे, विद्यार्थी.