केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नॅशनल क्राईम रेकाॅर्ड ब्युराे या शाखेमार्फत देशभरातील गुन्ह्यांची नाेंद ठेवली जाते. त्याचे जिल्हानिहाय वर्गीकरण केले जाते. प्रत्येक कलमांतर्गत दरवर्षी व जिल्हानिहाय घडणाऱ्या घटनांचा अभ्यास केला जातो. काेणत्या प्रकारचे गुन्हे वाढले आहेत यावरून काेणती उपायाेजना करायची यावर विचारमंंथन करता येते. एनसीआरबीने नुकताच अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात गडचिराेली जिल्ह्यात एकूण १ हजार ४२५ दखलपात्र गुन्हे घडले आहेत.
बाॅक्स
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गुन्ह्यांचे प्रमाण कमी
गडचिराेली जिल्ह्यातील ९० टक्के जनता ग्रामीण भागात राहते. जिल्ह्यात केवळ तीन नगर परिषदा आहेत. नगर परिषदा असलेली शहरेही फार माेठी नाहीत. आजपर्यंतच्या गुन्ह्यांचा अभ्यास केल्यास सर्वाधिक गुन्हे शहरांमध्ये घडत असल्याचे आढळून येते. गडचिराेली जिल्ह्यात शहरी लाेकसंख्या कमी असल्याने गुन्ह्यांचेही प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. त्यातही गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे.
बाॅक्स
मारहाणीचे सर्वाधिक गुन्हे
गडचिराेली जिल्ह्यात बलात्कार, खून यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या कालावधीत मारहाणीचे सुमारे ९०९ गुन्हे घडले आहेत. त्यातही किरकाेळ मारहाणीच्या गुन्ह्यांची संख्या सर्वाधिक आहे.
बाॅक्स
घडलेेले गुन्हे संख्या
खून - २७
खूनाचा प्रयत्न- ३६
मारहाण- ९०९
अपहरण- ९६
बलात्कार - १७
विनयभंग - १३६
चाेरी - ३८६
अपघात - २६८