शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

यापुढे देवीदेवतांना दारू वाहणार नाही; एकरा खुर्द गावाने बदलली प्राचीन परंपरा

By दिगांबर जवादे | Published: June 05, 2023 6:50 PM

दुर्गम भागातील आदिवासी आपल्या देवी देवतांना नैवेद्य म्हणून दारूचा वापर करतात. यामुळे नागरिकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याने सणासुदीला दारूऐवजी गाेड पदार्थ नवैद्य म्हणून वापरण्याचा निर्णय एटापल्ली तालुक्यातील एकरा खुर्द गावाने घेतला आहे.

दिगांबर जवादेगडचिरोली : दुर्गम भागातील आदिवासी आपल्या देवी देवतांना नैवेद्य म्हणून दारूचा वापर करतात. यामुळे नागरिकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याने सणासुदीला दारूऐवजी गाेड पदार्थ नवैद्य म्हणून वापरण्याचा निर्णय एटापल्ली तालुक्यातील एकरा खुर्द गावाने घेतला आहे.         मुक्तीपथतर्फे दोन दिवशीय सघन बैठकीचे आयोजन या गावात करण्यात आले होते. यावेळी घरगुती दारू वापर करण्यावर बंदी घालण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. आदिवासी गावांमध्ये देवी, देवतांच्या पूजेसाठी किंवा सणासुदीला घरगुती दारूचा वापर केला जातो. परिणामी दारू पिणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असते. यामुळे सघन बैठकीच्या माध्यमातून घरगुती दारुचे प्रमाण कमी करण्यासह दारू निर्मितीवर बंदी घालण्यावर ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली.

त्यानंतर गाव संघटन बैठक, युवा संघटन बैठक, महिला बैठक, स्तनदा माता बैठक, गाव ग्राम सभा घेण्यात आली. रात्री ‘शाब्बास रे गण्या’ चित्रपट दाखवून व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देत व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन तालुका संघटक किशोर मलेवार यांनी केले. दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमासाठी माजी सरपंच लेबळू गोटा, सोमजी नरोटे, भूम्या दोहे गोटा , आरोग्य सेविका एस. एस. गोलकोंडावार, अंगणवाडी सेविका गिता करमरकर, जनाबाई नरोटी यांनी सहकार्य केले.

टॅग्स :liquor banदारूबंदी