लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील तोडसा ग्रामपंचायती अंतर्गत २०१८ च्या तेंदू हंगामासाठी येथील शासकीय आश्रमशाळेच्या परिसरात ग्रामसभेच्या वतीने लिलावासाठी सभा घेण्यात आली. मात्र तिसऱ्यांदा बोलविण्यात आलेल्या या लिलाव प्रक्रियेत उपस्थित तीन कंत्राटदारांनी ग्रामसभेच्या निर्णयानुसार युनिट दर व बोनस दराची बोली केली नाही. त्यामुळे ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर लिलावाची सभा रद्द केली.या फेरलिलावाच्या सभेला अशोक मल्लेलवार, रितेश खंडेलवाल व मोहमद नूर हे तीन कंत्राटदार उपस्थित झाले होते. कंत्राटदारांनी अखेरीस तेंदूयुनिट व बोनस दराची बोली लावली. कंत्राटदारानुसार एक हजार तेंदूपुड्याला ६०० रूपये म्हणजे, १०० पुड्यामागे ६० रूपये बोनस देऊ, असे कंत्राटदाराचे म्हणणे होते. गतवर्षी एक हजार पुड्यामागे १६ हजार रूपये बोनस मिळाला होता. मात्र कंत्राटदारांनी यंदा कमी दर सांगितल्याने प्रक्रिया थांबली.
तिसऱ्यांदा तेंदू फेरलिलाव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:13 AM
लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील तोडसा ग्रामपंचायती अंतर्गत २०१८ च्या तेंदू हंगामासाठी येथील शासकीय आश्रमशाळेच्या परिसरात ग्रामसभेच्या वतीने लिलावासाठी सभा घेण्यात आली. मात्र तिसऱ्यांदा बोलविण्यात आलेल्या या लिलाव प्रक्रियेत उपस्थित तीन कंत्राटदारांनी ग्रामसभेच्या निर्णयानुसार युनिट दर व बोनस दराची बोली केली नाही. त्यामुळे ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर लिलावाची सभा रद्द केली.या ...
ठळक मुद्देतोडसा येथे सभा : कंत्राटदाराकडून कमी दराची बोली