शहरं
Join us  
Trending Stories
1
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
3
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
4
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
5
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
6
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
7
ग्राहकाचे 50 पैसे ठेवणं डाक विभागाला भोवलं! आता भरपाई पोटी किती रुपये द्यावे लागणार? निकाल जाणून थक्क व्हाल!
8
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
9
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत किती मराठा उमेदवार?
11
"उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन
12
"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा
13
'आम्ही युद्धाचे नाही, संवाद अन् मुत्सद्देगिरीचे समर्थक', BRICS मधून पीएम मोदींचा जगाला संदेश
14
आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत
15
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक आरोपी सापडला; आतापर्यंत ११ जणांना अटक
17
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?
18
Mahayuti Seat Sharing: 106 जागांचा गुंता, कोणत्या विभागातील किती जागांची घोषणा बाकी?
19
मंत्रि‍पदासाठी फोन आला, १०० रुपये उसने घेऊन कपडे घेतले अन् शपथविधीला गेले; श्रीगोंद्यातील नेत्याचा किस्सा! 
20
अरे देवा! ७ मुलांची आई बॉयफ्रेंडसह पळून गेली, ढसाढसा रडत मुलांनी गाठलं पोलीस ठाणं, म्हणाले...

आरमोरीतुन गजबेंना तिसऱ्यांदा तिकीट; होळींचा 'सस्पेन्स' कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 3:19 PM

समर्थकांची वाढली धाकधूकः अहेरी मित्रपक्ष राष्ट्रवादीला, अम्ब्रीशराव आत्रामांच्या भूमिकेकडे लक्ष

संजय तिपाले लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली: भाजपने जाहीर केलेल्या ९९ उमेदवारांच्या यादीत आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांचा समावेश आहे. मात्र, गडचिरोलीचा उमेदवार अद्याप निश्चित न केल्याने आमदार डॉ. देवराव होळी समर्थकांची धाकधूक वाढली आहे. गतवेळी भाजपकडे असलेला अहेरी मतदारसंघ मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) वाट्याला जाणार आहे. त्यामुळे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम कुठली राजकीय भूमिका घेतात, हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे. 

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी २० ऑक्टोबरला आपले पते खुले केले. त्यात आरमोरीतून आमदार कृष्णा गजबे यांना तिसन्यांदा संधी मिळाली. उमेदवारी पदरात पाडण्यात गजबे यशस्वी झाले असले तरी लोकसभा निवडणुकीतील मतदारांचा 'मूह' पाहता त्यांचा विजयाचा मार्ग आव्हानात्मक असणार आहे. लोकसभा निवडणुकीत आरमोरी विधानसभा क्षेत्रातून महायुतीचे सर्वाधिक ३३ हजार ४२१ इतके मताधिक्य घटले. त्यामुळे आमदार गजबे यांच्या वर्चस्वाला हा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. 

वाद चव्हाट्यावर, तिकीट कापल्याचे मेसेज दरम्यान, भाजपमध्ये गटबाजीचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. पहिली यादी जाहीर होण्यापूर्वीच डॉ. देवराव होळी यांचे तिकीट पक्षाने कापल्याचे मेसेज समाजमाध्यमात व्हायरल झाले, त्यामुळे राजकीय वर्तुळात पक्षांतर्गत बेबनावाची दिवसभर चर्चा होती.

पहिल्या यादीत होळींचे नाव का नाही?भाजपच्या पहिल्या यादीत नाव नसल्याने आमदार डॉ. देवराव होळी यांचे भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ते दिल्लीत ठाण मांडून आहेत. त्यांच्या उथळ वक्तव्याचे व्हिडिओ पक्षांतर्गत विरोधकांनी श्रेष्ठीना पाठविल्याची चर्चा आहे सिवाय आदिवासींच्या आरक्षण बचाव मोर्चात ते भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी झाली. पक्षातीलच काही विरोधक आपल्याविरुध्द सह्यांची मोहीम राबवत असल्याचा गौप्यस्फोट होळी यांनी केला होता. पक्ष त्यांच्याबाबत काय फैसला घेणार, याची उत्सुकता आहे. 

काँग्रेसकडून कोण येणार मैदानात ? आरमोरी येथे कृष्णा गजबे यांच्यापुढे काँग्रेसकडून मैदानात कोण उतरणार, याची उत्कंठा वाढली आहे. गजबे यांचा यापूर्वी २०१४ व २०२९ मध्ये माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्याशी सामना झाला. पण दोन्हीवेळी गेडाम यांना पराभव पत्कारावा लागला. यावेळी काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. काँग्रेस गेडामांनाच पुन्हा मैदानात उतरविणार की नवीन चेहरा देणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Gadchiroliगडचिरोलीarmori-acअरमोरी