लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मद्यधूंद अवस्थेत कार चालवून चार नागरिकांना जखमी करणाऱ्या वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली.ओमप्रकाश प्रल्हादनाथ गोजारा (२६) रा. कन्नमवार वार्ड देसाईगंज असे मद्यधूंद चालकाचे नाव आहे. ओमप्रकाश हा धानोरावरून गडचिरोली मार्गे देसाईगंजकडे जात होता. दरम्यान त्याने गडचिरोलीवरून बोदलीकडे जाणाºया राहूल रोहिदास मांदाळे (२४) रा. बोदली याला बुधवारी रात्री ८.३० वाजता बसस्थानकाजवळ धडक दिली. त्यानंतर ओमप्रकाश हा कार घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. भरधाव वेगाने वाहन चालवत त्याने पंचायत समितीजवळ अमित चापले यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये अमित चापले (२७) व ममता अमित चापले (२२) दोघेही रा. रामनगर गडचिरोली हे जखमी झाले. त्यानंतर पुन्हा पळून जाण्याच्या प्रयत्नात ओमप्रकाशने कार चुकीच्या बाजुने टाकली. यादरम्यान इंदिरा गांधी चौकातून धानोराकडे जात असलेल्या ट्रकला ओमप्रकाशच्या कारने धडक दिली. यामध्ये कारचे काही प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान गोळा झालेल्या नागरिकांनी ओमप्रकाशला बेदम मारहाण केली. नागरिकांनी जखमींना रूग्णालयात भरती केले. पोलिसांनी ओमप्रकाशला ताब्यात घेऊन त्यालाही रूग्णालयात भरती केले. त्याच्या विरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, १८४, १३४ एबी, १३४ बी अन्वये गुन्हा दाखल केला. गुरूवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. जखमींपैकी एकाचे नाव कळू शकले नाही.
‘त्या’ मद्यधुंद चालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:27 AM
मद्यधूंद अवस्थेत कार चालवून चार नागरिकांना जखमी करणाऱ्या वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली. ओमप्रकाश प्रल्हादनाथ गोजारा (२६) रा. कन्नमवार वार्ड देसाईगंज असे मद्यधूंद चालकाचे नाव आहे. ओमप्रकाश हा धानोरावरून गडचिरोली मार्गे देसाईगंजकडे जात होता.
ठळक मुद्देचौघे जखमी : गडचिरोली येथील अपघात