लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासनाने पेसा व वनहक्क कायद्यान्वये वनोपजाची मालकी व व्यवस्थापनाचा अधिकार ग्रामसभांना प्रदान केला. या अधिकाराचा वापर करीत गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास एक हजार ग्रामसभांनी यंदाच्या तेंदू हंगामात स्वबळावर तेंदूपत्ता संकलन व व्यवस्थापनाचे काम केले. या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने जिल्ह्यातील जवळपास ९९९ ग्रामसभा मालामाल झाल्या आहेत.जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावपातळीवर अनेकदा सभा घेऊन पेसा क्षेत्रातील गावांना स्वबळावर तेंदूपत्ता संकलन व व्यवस्थापन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. अनेकदा ग्रामसभाही घेण्यात आल्या. या ग्रामसभेत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तेंदू हंगामाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात तेंदू संकलनाच्या कामात ग्रामसभांचा पुढाकार वाढला आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने तेंदू संकलन व व्यवस्थापन करण्याबाबतचे ११३ ग्रामसभांचे पर्याय १ चे प्रस्ताव वनविभागाकडे सादर करण्यात आले. यापैकी १०७ ग्रामपंचायतींच्या प्रस्तावांना मान्यता मिळाली. त्यानंतरही काही ग्रामसभांनी प्रस्ताव सादर केले. यंदा २०१९ च्या तेंदू हंगामात कुरखेडा तालुक्यातील ७९, आरमोरी तालुक्यातील २३, एटापल्ली १९४, भामरागड ११४, अहेरी १६१, चामोर्शी ५९, सिरोंचा १२०, वडसा १, धानोरा १५७, गडचिरोली २८, मुलचेरा ३८ व कोरची तालुक्यातील २५ ग्रामसभांनी स्वबळावर तेंदूपत्ता संकलन करून त्याच्या व्यवस्थापनाचे काम स्वीकारले.वनहक्क कायद्यान्वये आणि पेसा क्षेत्रातील जंगलात ग्रामसभेच्या माध्यमातून तेंदू संकलनाचे काम करण्यात आले. हा हंगाम आता आटोपला असून वाळलेल्या तेंदू पुड्याची व्यवस्था लावण्याचे काम केले आहे. बोदभराईचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून या कामावर ग्रामसभांच्या पदाधिकाºयांचे पूर्ण नियंत्रण आहे.सदर ग्रामसभांच्या तेंदू संकलन कामातून जवळपास १ लाख ७६ हजार ४६९ एवढी अपेक्षित प्रमाणित गोणी तेंदूचे संकलन प्रशासनाने गृहित धरले आहे. ग्रामसभांमार्फत तेंदू संकलनाची आकडेवारी जिल्हा परिषद प्रशासनाला अद्याप प्राप्त होणे बाकी आहे.५८ हजारांवर कुटुंबांना मिळाला रोजगारपेसा क्षेत्रात ग्रामसभांच्या पुढाकाराने यंदाच्या हंगामात तेंदू संकलनाचे काम करण्यात आले. या तेंदू हंगामातून ५८ हजारांवर कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. कुरखेडा तालुक्यात ८ हजार १०४, आरमोरी २ हजार १३२, एटापल्ली १२ हजार ४१२, भामरागड ५ हजार ७०४, अहेरी २२ हजार ८८८, सिरोंचा ३ हजार ४०९, धानोरा ९४६ व गडचिरोली तालुक्यातील ३ हजार ७ इतक्या कुटुंबांना तेंदू संकलनाच्या कामातून रोजगार प्राप्त झाला आहे.
हजार ग्रामसभा मालामाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 10:28 PM
शासनाने पेसा व वनहक्क कायद्यान्वये वनोपजाची मालकी व व्यवस्थापनाचा अधिकार ग्रामसभांना प्रदान केला. या अधिकाराचा वापर करीत गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास एक हजार ग्रामसभांनी यंदाच्या तेंदू हंगामात स्वबळावर तेंदूपत्ता संकलन व व्यवस्थापनाचे काम केले. या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने जिल्ह्यातील जवळपास ९९९ ग्रामसभा मालामाल झाल्या आहेत.
ठळक मुद्देस्वबळावर संकलन व व्यवस्थापन : तेंदू हंगामातून आर्थिक उत्पन्न वाढले