नागभूषणम चकिनारपुवार।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुकास्थळापासून पाच किमी अंतरावर असलेल्या आरडा गावातील मल्लीकार्जुन स्वामी मंदिर परिसरात २३ व २४ डिसेंबर रोजी बोनालू (जत्रा) उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सिरोंचा तालुक्यातील व तेलंगणा राज्यातील जवळपास 10 हजार भाविकांच्या गदीर्ने मल्लीकार्जुन स्वामी मंदिराचा परिसर फुलून गेला होता.आरडा गावात असलेल्या मल्लीकार्जुन स्वामी मंदिरात दरवर्षी डिसेंबर महिन्यात जत्रा भरते. यावर्षी सुद्धा जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. मल्लीकार्जुन स्वामी यांचे भक्तगण सिरोंचा तालुक्यासह तेलंगणा व छत्तीसगड राज्यात आहेत. उत्सवादरम्यान विविध प्रकारची दुकाने लागली होती. भक्तगण मल्लीकार्जुन स्वामींचे दर्शन घेऊन पूजाअर्चा करीत होते. आपली मनोकामना पूर्ण व्हावी, यासाठी स्वामींना साकडे घालीत होते.बोनालू म्हणजे एका कलशात प्रसादरूपी खिर शिजविली जाते. शिजलेली खिर सजविलेल्या मडक्यात ठेवली जाते. नंतर ते मडके डोक्यावर घेऊन महिला भाविक मंदिराच्या सभोवताल तीन प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर स्वामींना प्रसाद अर्पण करून उपस्थित भाविकांनाही प्रसाद वाटला जातो.मल्लीकार्जुन स्वामी जत्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा आहे. सदर जत्रा भाविक व नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. भाविकांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम या गावात आयोजित केले जातात.जत्रा चांगल्या रितीने पार पाडण्यासाठी आरडा गावातील सरपंच रंगू बापू, सदाशिव रंगुवार, अशोक रंगुवार, किरण वेमुला यांच्यासह गावातील नागरिकांनी सहकार्य केले. जत्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सिरोंचा पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास सुपे, उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी उत्सव मंडळ समितीच्या पदाधिका?्यानी सहकार्य केले.तेलंगण व छत्तीसगड राज्यातील भाविकमल्लीकार्जुन स्वामी यांचे भक्तगण सिरोंचा तालुक्याला लागून असलेल्या छत्तीसगड व तेलंगणा राज्यात आहेत. बोनालू उत्सवासाठी हजारो भाविक या ठिकाणी आले होते. दरवर्षी बोनालूचे आयोजन केले जात असल्याने सिरोंचा तालुक्यातील हा महत्त्वाचा व मोठा उत्सव मानला जातो. एक महिन्यापासून नागरिकांमध्ये उत्सुकता राहते.रूंबालपेठात मलन्ना स्वामींची जत्राअंकिसा - येथून दोन किमी अंतरावर असलेल्या रूंबालपेठा येथे मलन्ना स्वामी यांची जत्रा भरली होती. स्वामीच्या दर्शनासाठी विविध ठिकाणाहून भाविक आले होते. रावी गोंडी नृत्य व भजन हे या ठिकाणचे विशेष आकर्षण होते. याही ठिकाणी तालुकाभरातील हजारो भाविक आले होते. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्वतालू येरोला, मल्लेश गग्गुरी, मलय्या येरोला, पोचम चेकुला, रामलू येरोला, बानय्या बद्दी, लच्चू येरोला यांच्यासह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.
आरडातील बोनालू उत्सवात हजारोंची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 9:45 PM
तालुकास्थळापासून पाच किमी अंतरावर असलेल्या आरडा गावातील मल्लीकार्जुन स्वामी मंदिर परिसरात २३ व २४ डिसेंबर रोजी बोनालू (जत्रा) उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सिरोंचा तालुक्यातील व तेलंगणा राज्यातील जवळपास 10 हजार भाविकांच्या गदीर्ने मल्लीकार्जुन स्वामी मंदिराचा परिसर फुलून गेला होता.
ठळक मुद्देमल्लीकार्जुन स्वामी मंदिरात भरते जत्रा : डोक्यावर कलश घेऊन भाविकांची प्रदक्षिणा