लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा पोलीस दलातर्फे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्रस्तरावर ‘आदिवासी विकास दौड’ आयोजित करण्यात आली होती. यात विजेत्या ठरलेल्या ४०० स्पर्धकांची अंतिम स्पर्धा गडचिरोली येथे पार पडली. विजेत्यांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले.पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्रस्तरावर मागील महिनाभरापासून विकास दौड स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये प्रथम आलेल्यांना गडचिरोली येथील अंतिम दौडमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती. अंतिम दौड स्पर्धा इंदिरा गांधी चौकापासून सुरूवात झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते दौड स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरविण्यात आले.मुलांमधून आकाश देवाजी शेंडे प्रथम, रितीत अजय पंचबुध्दे द्वितीय, राकेश नारायण लोहंबळे तृतीय, नागेश रमनय्या पसावे, वसंत शंकर गुरणे, अजय देवू लेकामी या तिघांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. मुलींमधून शुभांगी किरंगे प्रथम, काजल शंकर भर्रे द्वितीय, वनिता हिचामी तृतीय, निर्मला गावडे, निरूता लालसू पोटावी, सुशी शंकर हलामी यांना प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले. इतर स्पर्धकांमध्ये महेंद्र मुरारी कचलाम प्रथम, नारसिंग रमेश पावरा द्वितीय, निखील संजय वैरागडे तृतीय, संदीप विनोद उईके, कुलदीप ललित जांभुळे, तृप्ती कुमरे, विना गावडे यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. सीआरपीएफ जवानांमधून सत्येंद्र कुमार यादव, एम. कोरीयास्वामी, एस. भुपती यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. इतर स्पर्धकांमधून रूपा गोटा, शैला मंगरू कुसराम, चंद्रकांत धुर्वे, तुषार शंकर गावतुरे यांना विशेष प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.‘नक्षलवाद्यांच्या नादी लागून बहुमोल जीवन बर्बाद करू नका’तरूणांनो कष्ट करा अन् स्वत:चे पोट भरा. नक्षलवाद्यांच्या नादी लागून आपले बहुमोल जीवन बर्बाद करू नका, असे भावनिक आवाहन २० जुलै २०१९ च्या पोलीस-नक्षल चकमकीत ठार झालेल्या रूपी नरोटे हिचे वडील महारू नरोटे यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, रूपीला बालवयातच नक्षलवादी बळजबरीने घेऊन गेले. तिचे नाव सुशीला ठेवले. नक्षलवाद्यांसोबत गेल्यापासून ती फक्त दोनवेळा घरी आली. तिला आमच्यासोबत राहण्याचा सल्ला दिला. मात्र तिने माझे ऐकले नाही. दुसऱ्यांदा आली तेव्हा तिला आत्मसमर्पण योजनेविषयी माहिती दिली. मात्र तेव्हा सुध्दा ऐकली नाही. नक्षलवाद्यांमुळे आपली मुलगी मारली गेली. आमच्या म्हातारपणाचा आधार हिरावल्या गेला. नक्षलवादी लहान मुलांना बळजबरीने पालकांच्या सहमतीशिवाय नक्षल दलममध्ये सहभागी करतात. बालवयातच मुलांची आई-वडिलांसोबत असलेली नाळ तोडतात. निरागस बालपण व शिक्षणाचा अधिकार हिरावून घेतात. त्यामुळे ही मुले अशिक्षित राहिल्याने बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतात. युवकांनी नक्षलवाद्यांसोबत जाऊन स्वत:चे जीवन बर्बाद करू नये, त्याऐवजी स्वत:चा व्यवसाय करावा किंवा नोकरी करून जीवन सुकर करावे, असे आवाहन सुशीलाचे वडिल महारू नरोटे यांनी केले. दलममध्ये गेलेल्या आदिवासी तरूणांनी नवजीवन योजनेचा लाभ घेऊन विकासाच्या मूळ प्रवाहात येण्यासाठी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे, असे आवाहन सुध्दा केले आहे.
विकास दौडमध्ये जिल्ह्यात धावले हजारो आदिवासी युवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:21 AM
जिल्हा पोलीस दलातर्फे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्रस्तरावर ‘आदिवासी विकास दौड’ आयोजित करण्यात आली होती. यात विजेत्या ठरलेल्या ४०० स्पर्धकांची अंतिम स्पर्धा गडचिरोली येथे पार पडली.
ठळक मुद्देविजेत्यांना बक्षीस : गडचिरोलीतील अंतिम स्पर्धेत ४०० युवकांचा सहभाग, पोलीस विभागातर्फे ठिकठिकाणी आयोजन