शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

देसाईगंजात दारूबंदीच्या तीन कारवाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 6:00 AM

गोंदिया जिल्ह्यातून देसाईगंज शहरात दुचाकी वाहनाने दारू आणली जात असल्याची गोपनीय माहिती देसाईगंज पोलिसांना प्राप्त झाली. पोलीस हवालदार मोरेश्वर गौरकर, नाईक पोलीस शिपाई प्रेमकुमार भगत यांनी आमगाव ते सावंगी मार्गावरील नाल्याजवळ सापळा रचला. एमएच-४०-बी-६४०९ क्रमांकाची दुचाकी देसाईगंजकडे येताना दिसली. दुचाकीची तपासणी केली असता, दुचाकीवर देशी दारूचे पोते आढळून आले.

ठळक मुद्दे४० हजारांची दारू जप्त : कप्पे असलेल्या बनियनचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज पोलिसांनी गेल्या दोन दिवसात तीन वेगवेगळ्या कारवाया करून ३८ हजार ८०० रुपये किमतीची देशी दारू जप्त केली आहे. त्यात एका दुचाकीस्वारासह दोन जणांना कपड्यांच्या आतमध्ये व बॅगमध्ये देशी दारूच्या ३०-३० बाटल्या लपवून विकताना पकडले.१४ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजता रेल्वे स्टेशनवरून दारूची वाहतूक केली जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. सदर इसमाची बॅग तपासली असता, त्याच्या बॅगमध्ये आठ हजार रुपये किमतीची दारू आढळली. सुरज शंकर कांबळे (२१) रा.राजेंद्र वॉर्ड देसाईगंज यांना अटक केली.गोंदिया जिल्ह्यातून देसाईगंज शहरात दुचाकी वाहनाने दारू आणली जात असल्याची गोपनीय माहिती देसाईगंज पोलिसांना प्राप्त झाली. पोलीस हवालदार मोरेश्वर गौरकर, नाईक पोलीस शिपाई प्रेमकुमार भगत यांनी आमगाव ते सावंगी मार्गावरील नाल्याजवळ सापळा रचला. एमएच-४०-बी-६४०९ क्रमांकाची दुचाकी देसाईगंजकडे येताना दिसली. दुचाकीची तपासणी केली असता, दुचाकीवर देशी दारूचे पोते आढळून आले. त्यामध्ये १०० बॉटल होत्या. त्याची किंमत आठ हजार रुपये आहे. दुचाकीची किंमत २० हजार रुपये, असा एकूण २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोनू रमेश दांडेकर (१९) रा.आंबेडकर वॉर्ड, देसाईगंज यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.तिसरी कारवाई पोलीस स्टेशन परिसरातच करण्यात आली. तुकूम वॉर्डातील राहुल वानखेडे (३२) या युवकाची तपासणी केली असता, त्यांच्याकडे ३५ बॉटल आढळून आल्या. त्याची किंमत २ हजार ८०० रुपये होते. त्याने बॉटल ठेवण्यासाठी कप्पे असलेली बनियान शिवली होती. या कप्प्यांमध्ये त्याने बॉटल ठेवल्या होत्या. सदर कारवाई पोलीस शिपाई भावेश वरगंटीवार, श्रीकृष्ण जुआरे यांनी केली.निवडणुकीनिमित्त देसाईगंज पोलिसांनी दारूतस्करांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे देसाईगंजातील दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.महिलांची दारू अड्ड्यावर धाडमुरूमगाव : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील दारू बंदी महिला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धाड टाकून मोहफुलाची दारू जप्त केली आहे.पलटूराम भोयर यांच्या शेतात मोहफलांची दारू लपवून ठेवली असल्याची गोपनीय माहिती दारू बंदी पथकाला प्राप्त झाली. भोयर यांच्या शेतात तपासणी केली असता, त्याच्या शेतात पाच लिटर मोहफूलाची दारू आढळून आली. सदर दारू जप्त केली आहे. अजबसिंग विश्वकर्मा यांच्या शेतातूनही सात लिटर दारू जप्त केली आहे. मुरूमगावात दारू विक्रीवर बंदी आहे. दारूची विक्री करू नये याबाबत अनेकवेळा बजावूनही काही नागरिक दारू विक्री करतात. भोयर व विश्वकर्मा यांचे प्रकरण तंटामुक्त गाव समिती मुरूमगाव यांच्या कडे ठेवले जाणार आहे. तंटामुक्त समिती जो निर्णय घेईल तो निर्णय मानावा लागणार आहे. अशी माहिती दारू बंदी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. सदर कारवाई प्रतिभा उईके, बिंदिया मडकाम, आशोबाई पिट्टा, पुष्पा कोठवार, पार्वती तिरकी, संगिता पोया, पार्वती गवर्णा, देवंतीन भोयर, चैतीबाई देहारी, महानतीनबाई ओरमडीया, प्रेमिला कोटपरिया, अनारबाई पिद्दा, सायरा शेख यांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदी