एका कारमधून ही दारूची आयात छत्तीसगडमधून सुरू होती. गाडी व विदेशी दारूच्या बाटल्यांसह एकूण ५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील आरोपी गुलाब विठ्ठल देवगडे, ज्ञानेश्वर राजलींगु दुर्गे, सोहनलाल बालय्या चाफले सर्व रा.छल्लेवाडा, ता.अहेरी यांना अटक करण्यात आली.
छत्तीसगड येथील छुप्या मार्गाने अवैध दारू येत असल्याची माहिती अहेरी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना मिळाली होती. त्यानुसार रात्री १ वाजताच्या सुमारास महागाव मार्गावर सापळा लावून वाहनांवर नजर ठेवली. संशय आल्याने टीएस-१२/यू ए-४५२८ क्रमांकाची गाडी थांबवून झडती घेतली. त्या कारमध्ये विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
(बॉक्स)
व्हिस्कीसह बिअरच्या बाटल्या
या कारवाईमध्ये ३ लाख ५० हजार रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली. त्यात १४४०० रुपये किमतीची ४८ बाटल्या बिअर, ७२ हजारांचे ऑफिसर चॉईस विस्कीच्या २८८ बाटल्या, तसेच इम्पेरियल ब्लु व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ५७५ बाटल्या, ज्याची किंमत १ लाख ७२ हजार आहे, तसेच ७५० मिलीच्या १४४०० रुपयांच्या १२ बाटल्या व ६०० मिलीच्या ५७ हजार ६०० रुपये किमतीच्या ९६ बाटल्या असा एकूण ५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई एसडीपीओ पथकातील नायक नितीन पाल, श्रीकांत भंडे, शिपाई वडजू दहिफले, सुरज करपेत आदींनी केली.
===Photopath===
260621\img-20210626-wa0161.jpg
===Caption===
पकडलेली वाहन व दारू सह उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांचा पथक