या घटनेत ठार झालेल्या म्हशी या मोदुमोडगू येथील मल्लेश गुरुडवार यांच्या मालकीच्या आहेत. मंगळवारी दुपारच्या सुमारास गुरुडवार यांच्या मालकीच्या म्हशी जंगलात चरण्यासाठी गेल्या होत्या. संध्याकाळपर्यंत त्या परत न आल्याने त्यांनी म्हशीची शोधाशोध केली. मात्र म्हशींचा पत्ता लागला नाही. बुधवारी सकाळच्या सुमारास वनविकास मंडळाच्या लाकूड डेपोनजीक ३ म्हशी मृतावस्थेत पडलेल्या आहेत, अशी माहिती त्यांना मिळाली. घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता त्या म्हशी त्यांच्याच मालकीच्या असल्याचे लक्षात आले.
गुरुडवार कुटुंबाचा उदरनिर्वाह म्हशींचे दूध विक्री करून होत असे. त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून त्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी गुरुडवार यांनी केली आहे.
(बॉक्स)
गस्त वाढवून शिकाऱ्यांना आवरा
आलापल्ली वनविभागाच्या जंगलात शिकारी लोक वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी विद्युत प्रवाह लावून सापळा रचतात. त्यामुळे अनेकदा वन्यप्राण्यांसोबत जंगलात चरायला जाणारी गुरे-ढोरे-म्हशी सापळ्यात अडकून त्यांचा मृत्यू होतो. नजीकच्या काळात मुख्य मार्गानजीक लावलेल्या विद्युत प्रवाहाच्या सापळ्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने व महावितरणने या भागात गस्त वाढवून शिकारीला आळा घालण्याची जनतेकडून मागणी होत आहे.
===Photopath===
300621\img-20210630-wa0053.jpg
===Caption===
शिकारीसाठी लावलेल्या विद्युत प्रवाहात अडकून ३ म्हशींचा मृत्यू