शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

गडचिरोलीत तेलंगणात तस्करी होणारे तीन लाखांचे सागवान जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 10:47 AM

सिरोंचा वनविभागातील मौल्यवान सागवानाची तेलंगणात तस्करी करण्याचा प्रयत्न वनविभाग व पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून हाणून पाडण्यात आला.

ठळक मुद्देपाच आरोपींना अटक तीन फरार, वनविभाग व पोलिसांची कारवाई

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : सिरोंचा वनविभागातील मौल्यवान सागवानाची तेलंगणात तस्करी करण्याचा प्रयत्न वनविभाग व पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून हाणून पाडण्यात आला. यात ६.४७ घनमीटरचे १११ नग सागवान लाकूड व ट्रक जप्त करुन पाच आरोपींनाही अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी रात्री गस्तीदरम्यान करण्यात आली.गडचिरोली जिल्ह्यातील वनसंपदेची तेलंगणा राज्यात होणारी तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट, छत्तीसगड व तेलंगणातील वनाधिकाऱ्यांची आंतरराज्यीय बैठक गेल्याच महिन्यात झाली. त्याचे फलित म्हणून ही कारवाई करण्यात यश आले. सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण (भावसे) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय वनाधिकारी शंकर गाजलवार व वनपरिक्षेत्र अधिकारी विनायक नरखेडकर यांनी ही कारवाई केली.मर्रीगुडम जंगल परिसरातून कापलेल्या सागवानाचे १११ नग ट्रक (एपी ३६, एक्स ५४३६) मधून तेलंगणातील परिकोटा येथे नेले जात होते. वनविभागाच्या पथकाने गस्तीदरम्यान ट्रक अडवून तपासणी केलीे.टोळीतील पोचम रामय्या गावडे रा.मर्रीगुडम याच्यासह तेलंगणा राज्यातील सदानंद समय्या बंडूला रा.परिकोटा, श्रावणकुमार लक्ष्मीनर्सय्या कटकोजी (रा.हन्मकोंडा), गुंडेबोईना रामस्वामी रा.पंबापूर आणि तैशेट्टी समय्या राजलिंगू रा.कमनापूर या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. उर्वरित तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांचा शोध सुरू आहे.दरम्यान सर्व आरोपींवर मंगळवारी (दि.२) वनकायद्यानुसार गुन्हा दाखल करून वनकोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले.

मोबाईलवरून मिळविणार माहितीताब्यात घेतलेल्या आरोपींच्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआर तसेच टॉवर डम्प अ‍ॅनालिसिस करूनइतर आरोपींचा शोध लावला जाणार आहे. या कारवाईनंतर सिरोंचा वनविभागाकडून जंगलातील गस्त वाढविण्यात आली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा