शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

परतवाड्यात भरदुपारी थरार; तिघांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 5:00 AM

शहरात सोमवारी दिवसाढवळ्या ३८ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. या खुनाच्या घटनेनंतर उसळलेल्या उद्रेकात तीन जण गंभीर जखमी झाले. यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, एकाला मरणासन्न अवस्थेत अमरावतीच्या सामान्य रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनाक्रमानंतर परतवाडा, अचलपूर व सरमसपुरा या तीनही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली.

ठळक मुद्देउद्रेकानंतरच्या मारहाणीत दुसऱ्याची हत्या : दोन गंभीर, संचारबंदी लागू

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरात सोमवारी दिवसाढवळ्या ३८ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. या खुनाच्या घटनेनंतर उसळलेल्या उद्रेकात तीन जण गंभीर जखमी झाले. यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, एकाला मरणासन्न अवस्थेत अमरावतीच्या सामान्य रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनाक्रमानंतर परतवाडा, अचलपूर व सरमसपुरा या तीनही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली. शाळांना सुटी देण्यात आली. श्याम रघू खोलापुरे (३९, रा. शक्ती स्वीट मार्ट, महावीर चौक, परतवाडा), मो. अतिक मो. रफीक (५५, रा. गटरमलपुरा, परतवाडा) व सै. अली मो. कलिम (२१, रा. परतवाडा) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.परतवाडा शहरातील टिंबर डेपोत सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जुगाराचा वाद आणि जुन्या वैमनस्यातून चाकुहल्ल्यात श्याम रघू खोलापुरे (३९, रा. महावीर चौक, परतवाडा) हा घटनास्थळीच ठार झाला. त्याच्यावर विशिष्ट समुदायातील पाच ते सहा इसमांनी हल्ला चढविला. घटनास्थळावर जुगार चालू होता. जुगाराचे पत्ते घटनास्थळी तसेच पडून होते. घटनेची माहिती कळताच काहींनी शहरात उद्रेक केला. दगडफेकीसह मारहाण करण्यात आली. गुजरीबाजारातील फळविक्रेत्यांच्या गाड्या, फुलारी गल्लीतील फुलांच्या दुकानांची, दुचाकींची तोडफोड केली. शहरातील गुजरीबाजार, श्याम टॉकीज परिसर, मोची गल्ली-गटरमलपुºयातही हा उद्रेक बघायला मिळाला. शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, गटरमलपुरा येथील उपद्रवी युवकांच्या हल्ल्यात जखमींपैकी मो. अतिक मो. रफीक व सै. अली मो. कलीम (२४) यांचा मृत्यू झाला, तर मो. फैजान मो. अफसर (२१, सैलानी प्लॉट, परतवाडा) व मो. नईम मो. करीम (३८, रा. मुगलाईपुरा) हे गंभीर जखमी आहेत.उद्रेकानंतर शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. परतवाडा शहरातील बाजारपेठाही कडकडीत बंद केल्या गेल्यात.गुजरीबाजार, गटरमलपुºयात दहशतपरतवाडा शहरातील गुजरीबाजारातील फुलाडी गल्ली व गटरमलपुरा येथे असामाजिक तत्त्वांनी राडा घातला. या व्यावसायिक पेठेतील अनेक दुचाकींची तोडफोड करण्यात आली. चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. दुचाकी आडव्या टाकून काहींनी व्यापाऱ्यांना धमकावले. याच ठिकाणी काहींनी चौघांना बेदम मारहाण केली. त्यात चौघे गंभीर झाले.संचारबंदी पुढील २४ तासपरतवाड्यात दोन समुदायांतील तीन जणांचा खून झाल्यानंतर सोमवारी दुपारी ३.३० वाजता लागू करण्यात आलेली संचारबंदी पुढील २४ तासांकरिता राहणार असल्याचे अचलपूरचे एसडीओ संदीपकुमार अपार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ चे आदेशाच्या अधिन राहून विधानसभा-२०१९ साठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी, भरण्यासाठी इच्छुक उमेदवार निर्धारित वेळेत व तारखेत निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे उपस्थित राहू शकतात, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अचलपूर एसडीओ संदीपकुमार अपार यांनी स्पष्ट केले. संचारबंदी दरम्यान पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमू नये. मिरवणूक काढू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही शहरांना पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी