एटापल्ली तालुक्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास कसा करावा, असा नागरिकांसमाेर प्रश्न आहे. आलापल्ली-एटापल्ली हा मार्ग ३० किमी आहे. एटापल्ली-गट्टा ३६ कि.मी. आहे. एटापल्ली-जारावंडी हा मार्ग ५५ कि.मी. आहे. यासह एटापल्ली-मुलचेरा आदी प्रमुख चार मार्ग आहेत. एटापल्ली-मुलचेरा मार्ग चंदनवेलीपर्यंत सुस्थितीत आहे. यापुढे चंदनवेली ते बोलेपल्ली व देवदा ते मुलचेरापर्यंत मार्गाची दयनीय अवस्था आहे. सदर एक मार्ग वगळता इतर सर्वच मार्गांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. नाइलाजास्तव नागरिक कसेबसे वर्षभर प्रवास करतात. काही दिवसातच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. यावर्षीच्या तर उन्हाळ्यात रस्त्यांची दुरुस्ती हाेणे शक्य नाही. त्यामुळे यंदाच्याही पावसाळ्यात नागरिकांना या मार्गावरून प्रवास करावा लागणार आहे. आठवडाभरापासून मान्सूनपूर्व व अवकाळी पाऊस येत असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये साचत आहे. अनेक वाहनधारकांची वाहने खड्ड्यांमध्ये जाऊन त्यांची दिशाभूल हाेत आहे.
बाॅक्स
जनतेच्या समस्या मांडणार काेण?
एटापल्ली तालुका जंगलव्याप्त व नक्षलग्रस्त आहे. तालुक्यातील अनेक गावांपर्यंत अद्यापही पक्के रस्ते तयार झाले नाहीत. कच्च्या रस्त्यानेच नागरिकांना ये-जा करावी लागते. पावसाळ्यात येथील रस्त्यांवर चिखल असते. याशिवाय अनेक मार्गांवर उंच पुलांचा अभाव असल्याने पावसाळ्यात आवागमन करणे कठीण हाेते. परिसरात अद्यापही पक्के रस्ते निर्माण झाले नाही. ज्या लाेकप्रतिनिधींकडे आपल्या क्षेत्राचा विकास करण्याची जबाबदारी जनतेने दिली आहे, तेच लाेकप्रतिनिधी सर्वसामान्यांच्या समस्या साेडविण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. जिल्ह्याचे खासदार तर एटाल्ली तालुक्यात ये-जा करणे बंद केले आहे. लाेकप्रतिनिधीच जनतेच्या समस्या साेडविणार नसतील तर दुर्गम भागातील समस्या साेडविणार काेण? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
===Photopath===
220521\22gad_1_22052021_30.jpg
===Caption===
रस्त्यावरील खड्ड्यात अवकाळी पावसाचे पाणी अशाप्रकारे साचले आहे.