लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/सिरोंचा/आष्टी : तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेलेले मजूर मिळेल त्या साधनाने परत येत आहेत. रविवारी दिवसभरात जवळपास तीन हजार मजूर जिल्ह्यात परतले आहेत. चामोर्शी तालुक्यातील आष्टी, सिरोंचा, गडचिरोली तालुक्यातील वैनगंगा नदी पुलावरून सदर मजुरांनी जिल्ह्यात प्रवेश केला आहे.पहिल्या लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिलला संपला. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठेल, अशी आशा मजूर वर्ग बाळगूण होते. त्यानंतर शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला. ३ मे नंतर तरी लॉकडाऊन उठविला जाईल, अशी आशा असताना केंद्र शासनाने पुन्हा १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. दुसऱ्या राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना परत आणले जाईल, असे शासनामार्फत सांगितले जात आहे. मात्र शासनामार्फत प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास पुन्हा १५ दिवसांचा कालावधी लागू शकते. तोपर्यंत दुसऱ्या राज्यात थांबणे कठीण असल्याने मजूर वर्ग मिळेल त्या वाहनाने गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत.आष्टी, सिरोंचामार्गे सर्वाधिक मजूर गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. तेलंगणात अडकलेले मजूर ट्रक भाड्याने करून येत आहेत. सदर ट्रक महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर अडविले जात असल्याने त्याच ठिकाणी मजुरांना सोडले जात आहे. बहुतांश मजूर राजुरा तालुक्यातील शिरपूर मार्गे चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. त्यानंतर सदर मजूर आष्टी मार्गे गडचिरोली जिल्ह्यात येत आहेत. रविवारी दिवसभरात आष्टी मार्गे जवळपास दोन हजार मजुरांनी जिल्ह्यात प्रवेश केला. मूल मार्गानेही काही ट्रक गडचिरोली जिल्ह्यात आले.सिरोंचामार्गे ६०० मजुरांचा प्रवेशगोदावरी नदीवरील पुलावरून रविवारी दिवसभरात जवळपास ६०० मजुरांनी जिल्ह्यात प्रवेश केला. सकाळपासूनच तेलंगणातून येणाºया मजुरांची रांग लागली होती. आरोग्य विभागाचे पथक पुलाजवळ तैनात करण्यात आले होते. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक मजुराची नोंद घेतली. तर आरोग्य विभागाने मजुरांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर या मजुरांना ट्रक, टॅक्सीच्या सहाय्याने त्यांच्या गावाला पाठविण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील ३१ मजुरांचाही समावेश होता. या मजुरांना सिरोंचाहून खासगी बसची व्यवस्था करून देण्यात आली.सदर बस नागपूरपर्यंत सोडून देणार आहे. सिरोंचाचे पोलीस निरिक्षक अजय अहिरकर, उपनिरिक्षक विशाल जाधव, गजानन शिंदे आदींनी मजुरांच्या व्यवस्थेसाठी मदत केली. सिरोंचा येथील पत्रकार कौसर खान, प्यारेलाल उमरे, उज्वल तिवारी, नरेश धर्मपुरी यांनी मजुरांसाठी थंड पाणी उपलब्ध करून दिले.ट्रकचा आधार : तेलंगणा राज्यात जवळपास ११ हजार मजूर अडकले आहेत. शासनाने दिलेल्या परवानगीनंतर सदर मजूर आता गावाकडे परतत आहेत. शासनाने बस व ट्रेनची सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र त्याला बराच उशीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मजूर स्वत: वाहन करून गावाकडे परत येत आहेत. ट्रकमध्ये जास्तीत जास्त मजूर बसत असल्याने कमी खर्चात प्रवास करणे शक्य होते. त्यामुळे मजूर ट्रकद्वारे प्रवास करीत आहेत. असाच एक ट्रक तेलंगणातील राज्यातून मजुरांना घेऊन गडचिरोलीत येथे पोहोचला.गाव समित्या मजुरांना करणार क्वॉरंटाईनकोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात गाव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, युवक, तंमूस अध्यक्ष यांचा समावेश आहे. दुसºया राज्यात गावात आलेल्या मजुरांना १४ दिवस क्वॉरंटाईन ठेवण्याची जबाबदारी सदर समितीकडे राहणार आहे.
एकाच दिवशी तीन हजार मजूर परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 5:00 AM
पहिल्या लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिलला संपला. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठेल, अशी आशा मजूर वर्ग बाळगूण होते. त्यानंतर शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला. ३ मे नंतर तरी लॉकडाऊन उठविला जाईल, अशी आशा असताना केंद्र शासनाने पुन्हा १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. दुसऱ्या राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना परत आणले जाईल, असे शासनामार्फत सांगितले जात आहे.
ठळक मुद्देमिळेल त्या वाहनाचा घेतला आधार : सिरोंचा, आष्टी, व्याहाडमार्गे मजुरांचे लोंढे जिल्ह्यात करीत आहेत प्रवेश