लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रात्रीच्या सुमारास अवैध रेती वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर गडचिरोली तहसीलदारांनी जप्त केले आहेत. प्रत्येक ट्रॅक्टरवर सुमारे १२ हजार ९०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तीन ट्रॅक्टरचा मिळून एकूण ३८ हजार ७०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेतीची अवैैध वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती तहसीलदारांना प्राप्त झाली. त्यानुसार मारकबोडी येथे पाळत ठेवली असता, दोन ट्रॅक्टर रेतीची अवैैध वाहतूक रात्रीच्या सुमारास करीत असल्याचे आढळून आले. यामध्ये गडचिरोली येथील इंदिरानगर येथील जितेंद्र सहारे यांच्या मालकीचा एमएच ३३ व्ही - ०९६७ व विहिरगाव येथील सुधाकर जुआरे यांच्या मालकीचा एमएच ३३ एफ- ५१७७ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे. ५ फेब्रुवारी रोजी कुरखेडा-सावरगाव मार्गावर कुरखेडा येथील दयाराम उरकुडा वरखडे यांचा ट्रॅक्टर अवैैध रेती वाहतूक करताना रात्रीच्या सुमारास आढळून आला. या तिनही ट्रॅक्टरवर तहसीलदार दयाराम भोयर यांनी प्रत्येकी १२ हजार ९०० रूपयांचा दंड ठोठावला आहे. पुढील कारवाईसाठी बंदपत्र तहसीलदारांकडे सादर करण्यात आले. या कारवाईने रेती तस्कराचे धाबे दणाणले आहे.
रेती नेणारे तीन ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:41 AM
रात्रीच्या सुमारास अवैध रेती वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर गडचिरोली तहसीलदारांनी जप्त केले आहेत. प्रत्येक ट्रॅक्टरवर सुमारे १२ हजार ९०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ठळक मुद्दे३८ हजार रूपयांचा दंड सुनावला : सूर्यास्तानंतर सुरू होती वाहतूक