शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

वीज पडून तीन महिला जखमी

By admin | Published: November 13, 2014 11:01 PM

तालुका मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर असलेल्या वालसरा येथील एका शेतात धान कापणीचे काम करीत असतांना वीज पडून तीन महिला जखमी झाल्या. सदर घटना दुपारच्या सुमारास घडली.

चामोर्शी : तालुका मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर असलेल्या वालसरा येथील एका शेतात धान कापणीचे काम करीत असतांना वीज पडून तीन महिला जखमी झाल्या. सदर घटना दुपारच्या सुमारास घडली. मनिषा नीलकंठ संनडुके (३५), महानंदा उमाजी मडावी (३६), मंदाबाई श्यामराव मुलकलवार (४०) सर्व रा. वालसरा असे जखमी झालेल्या महिलांचे नाव आहे. वालसरा येथे धानपीक कापणीचा हंगाम जोरात असल्याने मंगलदास सातपुते यांच्या शेतात सदर महिला धान कापणीच्या कामासाठी गेल्या होत्या. दुपारी १ वाजताच्या सुमारास दुपारचे जेवण आटोपून धान कापणीचे काम करीत असतांना मेघ गर्जनेसह पाऊस झाला. दरम्यान अचानक वीज कडाडून शेतात काम करणाऱ्या महिलांच्या आसपास कोसळली. त्यामुळे सदर तिनही महिला जखमी झाल्या. जखमी महिलांना चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. सध्य:स्थितीत जखमी महिला रूग्णालयात उपचार घेत असून चामोर्शीचे तहसीलदार अशोक कुंभरे, पं. स. चे उपसभापती केशव भांडेकर यांनी ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन जखमी महिलांची विचारपूस केली. तहसीलदार अशोक कुंभरे यांनी नैसर्गिक आपत्ती योजनेंतर्गत जखमी महिलांना प्रत्येकी ९ हजार ३०० रूपयांची मदत जाहीर केली आहे. जखमी महिलांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. बिधान देवरी उपचार करीत आहेत. सदर घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)