गडचिराेली : अवैध दारूविक्री करणाऱ्या आराेपीस गडचिराेली न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
किसन रामसिंग धुर्वे (२३) रा.माेहडाेंगरी पाेस्ट बामणी ता.गडचिराेली असे शिक्षा झालेल्या आराेपीचे नाव आहे. किसन हा आपल्या घरी माेहफुलांची दारू काढत असल्याची माहिती गडचिराेली पाेलिसांना प्राप्त झाली. त्याच्या घराची झडती घेतली असता, घरात पाच लीटर हातभट्टीची दारू आढळून आली. त्याची किंमत एक हजार रुपये हाेते. त्याच्या विराेधात गडचिराेली पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून दाेषाराेपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. गुन्ह्याचा तपास सहायक फाैजदार भास्कर ठाकरे यांनी केला. १ एप्रिल राेजी गडचिराेलीचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन.पी. वासाडे यांनी आराेपीला तीन वर्षांचा सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड ठाेठावला. दंड न भरल्यास पुन्हा सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियाेक्ता मेघा महाजन यांनी काम पाहिले.