राकेश जनार्धन सावसाकडे (२५), अंकुश कालिदास कोटांगले (२२), भूपेश विनायक जराते (१८) तिन्ही रा.चामोर्शी माल, ता. आरमोरी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना मंगळवारी घडली.
पीडित युवतीचे आईवडील हे घरी हजर नसल्याची संधी साधत तीनही आरोपींनी मुलीच्या घरात प्रवेश केला. या वेळी युवतीची लहान बहीण व पीडितेचे तोंड दाबून आरोपी राकेश याने पीडितेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात पीडित युवतीची मोठी आई व बाबा घरी धावून आल्यावर या तिन्ही आरोपींनी तेथून पळ काढला केला. पीडितेचे आईवडील आरोपी राकेशला जाब विचारण्यास गेले असता, राकेशने तिच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पीडितेने मध्यस्थी केल्याने तिलासुद्धा मारहाण करून नालीत पाडले.
या प्रकरणाचा तपास आरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कांचन उईके, सहा. फौजदार देवराव कोडापे करीत आहेत.
बाॅक्स
१८ पर्यंत पीसीआर
आरोपीविरोधात भादंवि ३५४, ३५४ (अ),(१) (आय), ३४, ४५२, ३२३ सहकलम ७, ८ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर शुक्रवारी गडचिरोली येथील जिल्हा न्यायालयात आरोपींना नेले असता, त्यांना दिनांक १८ सप्टेंबरपर्यंत एक दिवसाची पोलीस काेठडी सुनावली आहे.