शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

वैनगंगेत जलपर्यटनाचा प्रस्ताव थंडबस्त्यात

By admin | Published: November 18, 2014 10:54 PM

जिल्ह्यात पर्यटन उद्योगाला वाव देण्यासाठी देसाईगंज ते सिरोंचा जलपर्यटन प्रारंभ करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने दोन वर्षापूर्वी योजना तयार केली होती. यासंदर्भात शासनालाही

बंधारे बांधावे लागणार : ‘सी प्लेन’ उतरविण्याची नवी योजनागडचिरोली : जिल्ह्यात पर्यटन उद्योगाला वाव देण्यासाठी देसाईगंज ते सिरोंचा जलपर्यटन प्रारंभ करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने दोन वर्षापूर्वी योजना तयार केली होती. यासंदर्भात शासनालाही योजनेचा प्रारूप आराखडा पाठविण्यात आला होता. परंतु शासनाने या योजनेला मूर्तरूप दिले नाही. त्यामुळे ही योजना कागदावरच राहिले आहे. आता विदर्भात खिंडसी ‘सी प्लेन’चा प्रयोग यशस्वी झाला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वैनगंगा नदीत असा प्रयोग करण्यात येईल, असे आश्वासन गडचिरोलीकरांना दिले होते. वैनगंगा नदीत प्रत्येक १० किमीनंतर बंधारे बांधून पाणी अडवून या ठिकाणी पर्यटन कम जलसिंचन असा दुहेरी हेतू साध्य करणारी योजना तयार करण्याचा मानस त्यांनीं व्यक्त केला होता. या ठिकाणी पर्यटनालाही चालना मिळेल, अशी ही योजना आहे. परंतु यासाठी वैनगंगेत बंधारे बांधण्याचे काम पहिले सुरू करावे लागणार आहे.विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या मार्कंडा ते चपराळा अभयारण्यापर्यंत वैनगंगा नदीत जलपर्यटन प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याची योजना तयार करण्यात आली होती. जिल्ह्यात वैनगंगा, इंद्रावती, खोब्रागडी, गोदावरी, प्राणहिता, कठाणी, पर्लकोटा, पामुलगौतम, सती आदी नद्या आहेत. यात जलपर्यटन सुरू करून रोजगाराची नवी संधी जिल्हा प्रशासन उपलब्ध करून देण्याविषयी प्रारूप आराखडा तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी तयार केला होता. व तसा प्रस्तावही शासनाकडे पाठविला होता.सिरोंचा तालुक्यात प्राणहिता, इंद्रावती, गोदावरी या नद्यांमध्ये बाराही महिने पाणी राहते. या नद्यांमध्ये जलपर्यटनाला चालना देऊन पर्यटकांना जिल्ह्याकडे आकर्षित करण्याचे काम हाती घेण्यात येणार होते. याअंतर्गत देसाईगंज, गडचिरोली, मार्कंडा, आष्टी, चपराळा, वांगेपल्ली, अहेरी, सिरोंचा या नदीघाटांवरमासेमारी करणाऱ्यांनाही मोटारबोट देण्याची तयारी प्रशासनाने केली होती. देसाईगंजचे पर्यटक नदीमार्गे सिरोंचापर्यंत पोहोचून आंध्रप्रदेशातील कालेश्वर मंदिराचेही दर्शन घेऊ शकतील. अशीही या प्रस्तावात सूचना होती. या प्रस्तावातील तांत्रिक अडचणी सध्या तपासून पाहण्यात येवून त्याला मूर्तरूप दिले जाणार होते. मार्कंडा येथे दर्शन घेऊन जलमार्गाने तत्काळ चपराळ्यालाही जाता येणे शक्य होणार होते. पावसाळ्याच्या दिवसात गावांचा तुटणारा संपर्कसुद्धा जोडून ठेवण्यात यश येईल. व नदी घाटावरील भागात मोटारबोट उपलब्ध होणार असल्याने तेथे तत्काळ सुविधाही पोहोचविता येतील, अशी प्रशासनाची धारणा होती. त्यादृष्टीने पर्यटन वाढीला व वनपर्यटनाला महत्व देण्यात येणार होते. या जलपर्यटनाच्या कार्यक्रमात आष्टी येथील इंग्रजकालीन विश्रामगृहाला रिसोर्ट बनविण्याचीही प्रस्तावात सूचना होती. मार्कंडावरून चपराळाकडे निघालेल्या पर्यटकाला आष्टी येथे थांबता येणेही शक्य होईल, असे नमुद करण्यात आले होते. हा प्रस्ताव शासनाकडे सादर झाला. मात्र त्यानंतर यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे जलपर्यटन अद्याप कागदावरच राहिले आहे.मात्र विधानसभा निवडणुकीच्या काळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वैनगंगा नदीत ‘सी प्लेन’मार्फत पर्यटनाला चालना देणारा प्रयोग गडचिरोली जिल्ह्यातही करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. सध्या मेहर विमान कंपनी (मेरीटाईम एनर्जी हेल एअर सर्व्हिसेस) सोबत महाराष्ट्र शासन व राज्य पर्यटन विकास महामंडळ हा प्रयोग राबवित आहे. प्रवरा धरणानंतर विदर्भातील खिंडशी प्रकल्पात हा प्रयोग यशस्वी करण्यात आला. वैनगंगा नदीवर बंधारे बांधून जलपर्यटन तसेच हवाई पर्यटन करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. केंद्र सरकारच्या जहाज बांधणी विभागामार्फत या योजनेसाठी गडचिरोलीकरिता विशेष निधीही उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले होते. गडचिरोलीत वैनगंगा नदी देसाईगंजपासून सिरोंचापर्यंत वाहत जाते. या नदीत हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी प्रत्येक १० किमी अंतरावर बंधारे करून पाण्याची अडवणूक करावी लागणार आहे. या पाण्याचा शेती सिंचनासोबतच जलपर्यटन तसेच हवाई पर्यटनासाठीही वापर होईल. याशिवाय वैनगंगेच्या काठावर व्यावसायिक मालही उभारले जातील. ही योजना मूर्तरूपात साकारल्यास गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचे चित्र पालटण्यास मदत होईल. (जिल्हा प्रतिनिधी)