शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

गडचिरोलीत पावसाचे थैमान; पूल वाहून गेले, संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 11:40 AM

वेधशाळेने विदर्भात तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला आहे.

ठळक मुद्देपिकांची अतोनात हानी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: गेल्या काही तासात झालेल्या अतिवृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात थैमान घातले आहे. वेधशाळेने विदर्भात तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला आहे.आलापल्ली ते सिरोंचा या मुख्यमार्गावरील मौसम ते नांदगाव च्या मध्ये असलेल्या नाल्याला प्रचंड प्रमाणात पाणी असल्याने मुख्य मार्गावरील वाहतूक सध्या बंद आहे तसेच कमलापूर ते छललेवाडा मार्गावरील पण एकछोटा पूल वाहून गेल्याची माहिती आहे. गुरुवारी सायंकाळपासून मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने छल्लेवाडा गाव संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेला आहे. येथील लोकांच्या घरात पाणी शिरल्याने मध्यरात्रीपासूनच लोकांची तारांबळ उडाली आहे.वेधशाळेने विदर्भात तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता.त्या अनुषंगाने प्रशासनाने याची दखल घेऊन दिनांक सहा आणि सात सप्टेंबर ला अंगणवाडी,सर्व शाळा आणि महाविद्यालय ला सुट्टी जाहीर केली आहे. वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे अगोदरच नदी,नाले तुडुंब भरून वाहत असताना जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.छल्लेवाडा गावातील नाल्याचा काठावर वसलेले भिमारगुडा, तेलुगूगुडा, कमरपल्ली,आदी मोहल्ल्यातील घरात पाणी शिरल्याने येथील लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मध्यरात्री अचानक पूर परिस्थिती निर्माण झाल्याने लोकांची एकच धावपळ सुरू झाली होती यामध्ये अनेकांचे कोंबडी आणि काही लोकांचे पाळीव प्राणी वाहून गेल्याची माहिती आहे. अचानक पणे पावसाचा कहर सुरू झाला आणि गावाशेजारी असलेल्या नाल्याचे पाणी घरात शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली.सध्या मुसळधार पाऊस सुरूच असून कमलापूर- छल्लेवाडा मार्ग सुद्धा बंद झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस