लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तालुक्यातील बेलगाव व बोदली परिसरातील धान पिकावर प्रचंड प्रमाणात मावा, तुडतुडा रोगाचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे धानाच्या उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.गडचिरोली शहराजवळ असलेल्या बोदली येथील मळाबाई गुरनुले, केशव कुनघाडकर यांच्या शेताची जिल्हा परिषद सदस्य अॅड. राम मेश्राम यांनी पाहणी केली. यावेळी प्रफुल्ल रामटेके, बाबुराव गेडाम, भगवान चिळंगे, मेघाजी कोडाप, श्रीराम मोहुर्ले, किसन साखरे, शालिक गावतुरे, केशव कुनघाडकर, भैय्याजी कत्रोजवार, गणपत पंदिलवार, प्रमोद भोयर, संजय नैताम आदी गावकरी उपस्थित होते. बोदली परिसरातील इतरही शेतकºयांच्या शेतात मावा, तुडतुड्याने थैमान घातले आहे. त्यामुळे नुकसानीचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अॅड. राम मेश्राम यांनी केली.बेलगाव येथील संजय पिपरे यांच्या शेतासह इतरांच्या शेतातील धानपिकाची पंचायत समिती सदस्य शंकर नैताम, गोहणे, बंडू लटारे, डंबाजी पेंदाम यांनी पाहणी केली. बेलगाव परिसरातीलही शेतकºयांच्या धानाला मावा, तुडतुडा रोग लागला आहे. अनेक फवारण्या करूनही आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.जिल्हाभरात तुडतुडा रोगाने थैमान घातले आहे. हातात आलेले पीक करपत असताना बघून शेतकरी चिंतेत सापडला आहे. शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्हाभरातील शेतकºयांकडून करण्यात येत आहे.
बेलगाव व बोदली परिसरात धानावर तुडतुड्याचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 11:59 PM
तालुक्यातील बेलगाव व बोदली परिसरातील धान पिकावर प्रचंड प्रमाणात मावा, तुडतुडा रोगाचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे धानाच्या उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
ठळक मुद्देरोगाने धानपीक करपले : सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्याची मागणी