लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यात यावर्षी पुन्हा पट्टेदार वाघाने आपले अस्तित्व दाखवत दहशत निर्माण केली आहे. आरमोरी क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला तत्काळ जेरबंद करावे, अशी मागणी आ.कृष्णा गजबे यांनी राज्याचे वित्त, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.पट्टेदार वाघाच्या दहशतीने आरमोरी तालुका पुन्हा हादरला आहे. मंगळवारी आरमोरीजवळील रामपूर चक नजीकच्या जंगलात पट्टेदार वाघाने गायीच्या कळपावर हल्ला करून एका गायीला ठार केले. शिकारीनंतर गायीवर ताव मारण्यासाठी दुसºयाकडे घेऊन जातानाचे क्षण वनविभागाने लावलेल्या कॅमेºयात ट्रॅप झाले आहे. वाघाच्या धुमाकुळामुळे आरमोरी परिसरातील नागरिक प्रचंड भयभीत झाले आहे. या समस्येची दखल घेऊन आ.कृष्णा गजबे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबई येथील मंत्रालयात भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले.आरमोरी भागात पट्टेदार वाघ धुमाकूळ घालित असल्याने नागरिक भयभित झाले असून ही समस्या गंभीर बनली आहे, असे आ.गजबे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सांगितले. सदर विषयावर त्यांनी मुनगंटीवार यांच्याशी प्रदीर्घकाळ चर्चा केली.निवेदनात आ.गजबे यांनी म्हटले आहे की, आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या आरमोरी तालुक्यात पुनश्च वाघाचा संचार असल्याचे निदर्शनास आले आहे. २८ नोव्हेंबर रोजी आरमोरी नगर परिषदलगतच्या रामपूर येथे वनविभागाने लावलेल्या ट्रॅपिंग कॅमेºयामध्ये गायीला ठार केल्याचे क्षण दिसत असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरमोरी तालुक्यातील चुरमुरा येथील मागील १५ दिवसांपूर्वी वाघाने एका व्यक्तीवर हल्ला करून जखमी केले. त्यामुळे वाघाला तातडीने जेरबंद करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी आ.गजबे यांनी केली आहे.भीतीमुळे शेतीची कामे बंदआरमोरी परिसरात शेतीची कामे जोमात सुरू आहेत. खरीपाची धान कापणी, बांधणी तसेच रब्बी हंगामातील पीक लागवडीचे काम सुरू आहे. मात्र या भागात वाघाची दहशत निर्माण झाल्याने शेतकºयांनी आता शेतावर जाऊन काम करणे बंद झाले आहे. ये-जा करणाºया विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
‘त्या’ वाघाला जेरबंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:15 AM